मुंबई : तांब्याच्या भांड्यात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हृदयाचं आरोग्य असो, वजन कमी करायचे असो किंवा स्कीनचा त्रास असो. तांब्याच्या भांड्यात खाल्याने यामध्ये लाभ होतो. पण तांब्याच्या भांड्यात सर्वच वस्तू खाणे योग्य नाही. काही गोष्टी शरीराला हानीकारक ठरु शकतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेअरी प्रोडक्ट टाळा.


कोणतेही डेअरी प्रोडक्ट तसे की, दूध, दही, पनीर याचं सेवन तांब्याच्या भांड्यात करु नये. तांब्याच्या भांड्यात मीठाचे पदार्थ शिजवू नयेत. मीठात असलेले आयोडीन तांब्यासोबत प्रतिक्रिया होऊन हानिकारक ठरते.


लाल पेशी वाढतात


तांब्याच्या भांड्यात खाल्याने शरीराला आयरन तत्त मिळतात, सोबत शरीरातील लाल पेशी देखील वाढण्यास मदत होते. हे इम्यून सिस्टमला मजबूत करतात. शरीरात आयरनच्या शोषणासाठी मदतगार ठरते. तांब्याच्या भांड्यात खाल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.


वजन कमी करण्यास उपयुक्त


तांब्याच्या भांड्यात खाल्ल्याने चयापचय गतिमान होऊन वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल तर तांब्याच्या भांड्यात खा.


पोट फुगण्याची समस्या होईल दूर


तांब्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. यामुळे पोटातील अल्सर आणि अपचनाची समस्या दूर होते. तांब्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न पचन बरोबर ठेवते. तांबे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.


वृद्धत्वाची समस्या


तांब्याच्या भांड्यात खाल्ल्याने वृद्धत्वाची समस्या दूर होते. हे वृद्धत्व टाळण्यास मदत करते. रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचेला चमक देते.