`या` पदार्थांचा वापर ठरेल चेहऱ्यासाठी घातक
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लहान मोठे आजार उद्भवतात.
मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लहान मोठे आजार उद्भवतात. लहान मोठ्या स्वरूपाचं दुखणं असेल तर सहाजिकच डॉक्टरांकडे न जाता सुरूवातीला केवळ नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले जातात.आजारपणाप्रमाणेच चेहर्यावरील डाग, अॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठीही घरगुती उपाय केले जातात. पण असे काही पदार्थ ज्यांचा वापर चेहऱ्यावर केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
मेयॉनीज -
त्वचेतील मॉईश्चरायझर टिकून राहण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या मॉईश्चरायझरचाच वापर करा. कारण मेयॉनीझचा वापर केल्यास त्वचेतील छिद्र क्लॉग होऊ शकतात. परिणामी अॅक्नेचा त्रास वाढू शकतात.
कच्ची अंडी -
अंड्याचा मास्क बनवून चेहर्यावर लावल्यास पोअर्स टाईट होण्यास मदत होते. तसेच अनावश्यक केस काढले जातात. असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला, बघायला मिळतो. पण अंड्यातील बॅक्टेरियांचे प्रमाण फूड पॉयझनिंग करण्यास कारणीभूत ठरते. परिणामी त्यामुळे त्रासदेखील होऊ शकतो.
लिंबाचा रस -
लिंबाचा रस टॅनिंग कमी करण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी वापरा असा सल्ला दिला जातो. परंतू त्यामधील अॅसिडीक घटक त्वचेचे नुकसान करू शकतात. अनेकदा फेस पॅकमध्येही लिंबाचा रस असल्यास त्वचेमध्ये जळजळ जाणवते.
दालचिनी -
मसाल्याचा वापर करून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं असा सल्ला दिला जातो. पण दालचिनीमुळे त्वचेतील जळजळ वाढते.