Foods that lower cholesterol : रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या कोलेस्टेरॉलपासून (cholesterol) हृदयाला मोठा धोका (Heart Problem) असतो. कोलेस्टेरॉल हे स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि कार्डियाक अरेस्टचं प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाबाचे (Blood preasure) रुग्ण असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक गंभीर असतो. अशा स्थितीत व्यायामाबरोबरच आहारही उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आहारात कोलोस्ट्रॉल कमी करणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीमयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात असले पाहिजेत. 


ओमेगा 3 फॅटी ऍसिड


UK आरोग्य संस्था NHS च्या मते, ओमेगा फॅटी ऍसिडसयुक्त पदार्थ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसंच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. सूर्यफुलाच्या बिया, चिया सिड्स, अक्रोड, फ्लेक्ससीड्स, स्प्राउट्स इत्यादींचा आहारात भरपूर समावेश करा.


बदाम


प्रति 25 ग्रॅम बदामामध्ये सुमारे 5.3 ग्रॅम प्रोटीन असतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम हे एक उत्तम पदार्थ मानला जातो. त्यात हेल्दी फॅट असतं जे हृदयासाठी आरोग्यदायी असतं. बदामामध्ये फायबरसह ते सर्व घटक असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.


कॉटेज चीज


कॉटेज चीज हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं. त्यात चरबीचं प्रमाण कमी आहे आणि प्रति 165 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 20.3 ग्रॅम प्रोटीन असतं. याव्यतिरिक्त, हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं.


आहारात डाळीचा समावेश


सर्व प्रकारच्या डाळींमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूपच कमी असते. त्यात कोलेस्टेरॉल कमी करणारे फायबर जास्त असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळ असतं. कोणत्याही प्रकारच्या 120 ग्रॅम डाळीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन असतात.


कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?


कोलेस्‍ट्रॉल म्‍हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील फॅट्स वाढवतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.


गुड कोलेस्टेरॉल  हृदयविकाराच्या रुग्णासाठी फायदेशीर असतं. कारण यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. कारण यात हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एचडीएलची (HDL) पातळी वाढलेली असते. तर, बॅड कोलेस्टेरॉल अत्यंत घताक असतं. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये (Wall) जमा होतं. यामुळे हृदयविकाराचा झटक येण्याटी (Heart Attack) किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची तसेच पक्षाघात होण्याची भिती असते.