पचनाची समस्या? हे फळं म्हणजे पचनावर सिक्रेट औषध, नावं आणि फायदे जाणून घ्या
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर पाहायला मिळतायत.
Healthy fruits for cough and digestion : सध्याच्या वेगवान जीवनशैलीत तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर पाहायला मिळतायत. अशात शेवटी रुग्णालयात दाखल होऊन मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून उपचार करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला पुढील धोका टाळायचा असेल तर आताच शरीराला योग्य आहार दिला पाहिजे. तर तुमचं शरीरही सुधृढ राहण्यास मदत होईल. म्हणूनच कफ आणि पचनाच्या समस्या असल्यास तुम्हाला खालील दिलेल्या फळांच्या सेवनाने फायदा होईल.
द्राक्षे :
व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C यासोबतच पोटॅशियम आणि कॅल्शियम यांच्यासाठी द्राक्ष खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. द्राक्षांच्या नियमित सेवनाने तुमची पचनशक्ती सुधारते आणि अधिक मजबूत होते. द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासही मदत होते.
हेही वाचा - दारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम
पेर :
ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली आहे. अशात तुम्ही पेर खाल्ल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं. यातील पेक्टिन घटकामुळे तुमचं पोट साफ ठेवण्यास मदत करते. तुम्ही पेर फळाचा ज्यूस घेतल्यास त्याचाही शरीरास चांगला फायदा होतो. उन्हाळ्यात हे फळ खाणं अत्यंत फायद्याचं आहे.
पपई :
व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, फोलेट, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असलेलं फळ म्हणजे पपई. पपई खाल्ल्याने आतडी साफ होतात यामुळे बद्धोष्ठता होत नाही.
Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल...
सफरचंद :
An Apple a day keeps doctor away म्हणजे तुम्ही रोज एक सफरचंद खाल्ल्यास तुम्ही आजारांना दूर ठेवू शकतात असं बोललं जातं. सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्यास आयोग्यास लाभ होतो. खास कफ आणि पचनाबाबत बोलायचं झाल्यास सफरचंदाने पोट साफ होण्यास मदत होते. सफरचंदातील सॉर्बिटॉलमुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
नोंद - वरील बातमीतील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. सर्वसामान्य आयुष्यात याचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या