मुंबई : तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अनियोजीत आणि बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. त्याचबरोबर, कधीकधी काही आजारांमुळे लोक त्यांचं वजन नियंत्रित करू शकत नाहीत. गेल्या काही वर्षांत, लोकांचे लवकर वजन वाढण्याशी संबंधित अनेक अहवाल आले आहेत आणि यामध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच सिद्ध झालं आहे.


ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांचा लठ्ठपणा का वाढतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये काही चुका या सामान्य असतात, ज्या त्यांचं वजन वाढण्याचं कारण बनू शकतात. बऱ्याचदा लोक या सवयी किरकोळ मानतात आणि त्या पुन्हा पुन्हा करतात आणि अशा सवयींचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही असं त्यांना वाटतं. पण तुमचा हा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.


वेळेवर जेवण न करण्याची सवय



ऑफिसला जाणाऱ्याची एक सामान्य सवय म्हणजे जेवणासाठी विशिष्ठ अशी कोणतीही वेळ निश्चित केलेली नसते. जसे की, काहीजण 12 वाजता तर काही 4 वाजता जेवायला निघतात. काही वेळा तर काम जास्त असल्यामुळे अनेकजण जेवणही करत नाहीत. पण, खाण्या-पिण्याशी संबंधित असा निष्काळजीपणा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतो. खरतंर, दुपारचं जेवण उशिरा घेण्याच्या सवयीमुळे शरीरातील पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढू लागतं.


चावून न खाणे



कामाच्या व्यापापोटी अनेकदा जेवण घाईत केलं जातं. या सवयींमुळे, लवकर त्यांचं पोट भरलेलं वाटतं, पण व्यवस्थित चावलं न गेल्यामुळे जेवण पचणं खूप कठीण होतं. यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण हळूहळू वाढू लागतं आणि लठ्ठपणा वाढतो.


विचार न करता खाणं-पिणं



अनेकांना काम करताना काहीतरी खाण्याची सवय असते. या सवयीला binge eating असं म्हटलं जातं. असे लोक कुकीज, चिप्स आणि तळलेले पदार्थ खात राहतात. त्यासोबतचं, ऑफिसमध्ये असताना चहा-कॉफी पिण्याची सवयही लोकांमध्ये दिसून येते. या सवयींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, रक्तातील साखरेचं प्रमाण आणि चरबीचं प्रमाण वाढू लागतं आणि या सर्वांमुळे लठ्ठपणा वाढतो.


सुर्यप्रकाशाचा अभाव



सकाळी उठल्याबरोबर लोक ऑफिसच्या दिशेने धावतात आणि सूर्यास्तानंतर लोक रात्री ऑफिसमधून बाहेर पडतात. यामुळे सूर्यप्रकाश लोकांच्या शरीरावर अजिबात पडत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा मुख्य स्त्रोत आहे आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्हीची जाणवायला लागते. यामुळे हाडांशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्याबरोबरच लोकांमध्ये लठ्ठपणाही वाढू लागतो. अनेक अभ्यासांमध्ये असं सिद्ध झालंय की सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका नियमितपणे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या लोकांपेक्षा अधिक वाढू शकतो.