मुंबई : आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. वजन घटवण्यासाठी अनेकजण  जीममध्ये घाम गाळतात, कडक डाएट फॉलो करतात. मात्र काही दिवसांनंतर हा उत्साह कमी होत जातो. अशावेळी घटवलेले वजन पुन्हा झपाट्याने वाढण्याची भीती असते.  म्हणूनच व्यायाम, डाएटच्या सोबतीने वजन घटवण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवा.  


जेवणानंतर लगेजच झोपू नका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीच्या जेवणानंतर लगेजच झोपण्याची सवय टाळा. झोप आणि जेवणामध्ये किमान 2 तासाचे अंतर असणं आवश्यक आहे तसेच रात्रीची किमान 8 तास झोप आवश्यक आहे. जेवल्यानंतर लगेजच झोपण्याच्या सवयीमुळे फूड ट्रायग्लासराईड्स मध्ये बदल होऊन वजन वाढते. 


प्रोटीन शेक  


रात्रीच्या जेवणात प्रोटीन घटकांचा समावेश करा. वजन घटवणार्‍यांनी रात्री प्रोटीन शेक प्यावे. प्रोटीन घटक डायजेस्ट होण्यासाठी अधिक कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. 


थंड वातावरण 


झोपताना तुमच्या खोलीत वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण थंड खोलीमुळे शरीर गरम राहते. परिणामी वेगाने फॅट बर्न होण्यास मदत होते.  


नाईट लाईट   


रात्री अनेकांना खोलीत नाईट लाईट लावून झोपण्याची सवय असते. मात्र या सवयीमुळे झोपेवर परिणाम होतो. काही संधोधनानुसार, नाईट लाईटमुळे शरीरात मेलाटोनिन हार्मोन्स वाढतात. परिणामी वजन  वाढते. 


खूपवेळ झोपणं  


अतिझोपदेखील आरोग्याला घातक आहे. अति झोपल्यानेदेखील दिवसभर आळस जाणवतो. अतिझोपल्याने वजन वाढते, पोटाचे, पचनाचे विकार बळावतात. शरीरात उर्जा टिकून राहण्याची क्षमता मंदावते.