Coffee चे सेवन या लोकांनी अजिबात करु नये, ठरु शकते हानिकारक
कॉफी पिणे कोणत्या व्यक्तींसाठी योग्य नाही. जाणून घ्या आणि त्यापासून लांब राहा.
मुंबई : चहा किंवा कॉफी अनेकांसाठी रिफ्रेशमेंटचं साधन असतं. अनेकांना याची जणू नशाच असते. कॉफी चवदार वाटत असली तरी तिचे अनेक तोटेही आहेत. जर तुम्ही या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर कॉफीपासून दूर राहा. कॉफी चवदार असली तरी त्यात असलेले कॅफिन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोणत्या आरोग्य समस्या असताना कॉफी पिऊ नये. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Side effects of coffee)
कॉफी चवदार असली तरी त्यात असलेले कॅफिन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या कोणत्या आरोग्य समस्यांदरम्यान तुम्ही कॉफी पिऊ नये.
मोती बिंदू : डोळ्यांशी संबंधित ही समस्या असल्यास कॉफीसारख्या पदार्थांचे सेवन टाळावे. कॉफीमध्ये असलेले घटक मोतीबिंदूची समस्या आणखी वाढवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हृदयाची धडधड : कॉफीमध्ये असलेले कॅफिन हृदयाचे ठोके वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे रक्तदाबाची पातळी बिघडू शकते. जर तुम्हाला बीपीचा त्रास नको असेल तर कॉफी फक्त माफक प्रमाणात प्या.
झोपेचे विकार : कॉफीच्या सेवनाने झोप न येण्याची समस्या वाढू शकते, असा दावा अनेक अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे. ज्यांना झोपेचा त्रास होतो त्यांनी कॉफी पिणे टाळले पाहिजे.
डायरिया : कॉफीचा प्रभाव गरम होतो असे मानले जाते आणि ज्यांना पोटदुखी किंवा जुलाबाची समस्या आहे त्यांनी अशा परिस्थितीत चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमधील घटक अतिसाराची समस्या आणखी वाढवू शकतात.