चिकन, अंड्यांशिवाय `या` पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Vegetarians Protein Foods in Marathi : प्रोटीन एक महत्त्वाचा घटक आहे, जे अनेक पदार्थांमधून शरीराला मिळत असते. आरोग्यासाठी ज्याप्रकारे योग्य व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे आहे, त्याचप्रमाणे निरोगी आरोग्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीन फक्त बॉडी बनवणाऱ्यांसाठीच गरजेचे नाही. तर शारीराच्या रोजच्या कामकाजांसाठीही महत्त्वाचे असते. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचे काम करते. प्रोटिनमुळे शरीरात लाल पेशीची निर्मिती आणि सामान्य मेटाबॉलिज्म तयार होते. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्ही उत्तम प्रोटीन शोधात असाल तर तुमच्या स्वयंपाक घरात तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात.
बहुतेक लोकांना असे वाटते की प्रोटीन फक्त मांसाहारी पदार्थांमधून जसे की, चिकन, मांस, मासे किंवा अंड्यांमधून मिळतात. पण शाकाहारीमध्ये पण असे पदार्थ आहेत, ज्यामुळे तुम्हाला मांसाहारीपेक्षा अधिक प्रोटीन मिळेल. तसेच पुरुषांनी किमान 55 ग्रॅम प्रोटीन आणि महिलांनी 45 ग्रॅम प्रोटीन दररोज घेतले पाहिजेत.
मसूर
शाकाहारी लोकांसाठी मसूर हा प्रोटीनसाठी उत्तम स्रोत आहे. एक कप (198 ग्रॅम) शिजवलेल्या मसूरमध्ये 17.9 ग्रॅम प्रोटीन असतात. त्याच प्रमाणात मसूरमध्ये 15.6 ग्रॅम फायबर असते. त्यात लोह देखील भरपूर असते, जे शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. मसूर देखील रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकते.
छोले चणे
चणे हा फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. एक कप (164 ग्रॅम) शिजवलेल्या चणामध्ये 14.5 ग्रॅम प्रथिने आणि 12.5 ग्रॅम फायबर असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चणे हे सर्वोत्तम अन्न आहे. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
राजमा
राजमा हे सर्वात जास्त वापरल्या जाणार्या शेंगापैकी एक आहे. एक कप (177 ग्रॅम) शिजवलेल्या राजमामध्ये 15.3 ग्रॅम प्रोटीन असतात. हे फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे, जे रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. राजमा खाल्ल्याने उच्च रक्तदाबासारख्या हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सोयाबीन
सोयाबीन हा फायबर, प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. एक कप (172 ग्रॅम) शिजवलेल्या काळ्या बीन्समध्ये 15.2 ग्रॅम प्रथिने मिळतात. विविध प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, काळा सोयाबीन पचनास मदत करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
मूग डाळ
मूग डाळ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. एका कप उकडलेल्या हिरव्या हरभऱ्यामध्ये सुमारे 14.2 ग्रॅम प्रथिने आढळतात. याशिवाय 15.4 ग्रॅम आणि 54.5 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)