मुंबई : पोहणं हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे वजन घटवणार्‍यांसाठी ही एक इंटरेस्टिंग अ‍ॅक्टिव्हिटी आहे. शरीराच्या मानसिक आणि शारिरीक विकासासाठी स्विमिंग मदत करते. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आपण जसे आहाराचे पथ्यपाणी सांभाळतो तसेच आपल्या फीटनेस  अ‍ॅक्टिव्हिटींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. तुम्हांला स्विमिंग करण्याची आवड असल्यास पावसाळ्यात स्विमिंग करण्यापूर्वी हा सल्ला नक्की जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Centers for Disease Control and Prevention (CDC)च्या अहवालानुसार, जुलै महिन्यात स्विमिंग केल्याने सुमारे 60% आजारांची साथ पसरण्याचा धोका असतो. नदी, तलाव आणि समुद्रामध्ये पोहणार्‍यांना हा धोका अधिक असतो. यांच्यामध्ये आजार अधिक बळावतात. अमेरिकेत 2000 ते 2014 या दरम्यान या काळात 140 विविध आजार पसरले आहेत. हे आजार 35 विविध राज्यात पसरले आहेत. यामध्ये अमेरिकन आयलंड्सचाही समावेश आहे. 


  कोणत्या बॅक्टेरियांचा धोका अधिक?   


  पावसाळ्याच्या दिवसामध्ये गॅस्ट्रोइस्टेन्शिअल आजारांना कारणीभूत ठरणार्‍या ई -कोलाय या बॅक्टेरियाशी निगडीत अनेक आजार वाढल्याचे दिसून आले आहेत. पाण्यामध्ये दूषित घटक, सांडपाणी मिसळलेले पाणी आरोग्याला अधिक धोकादायक असते. पाण्यातील विषारी, धोकादायक घटकांशी संपर्क आल्याने या आजारपण अधिक वाढते.   


  स्विमर्सनी कोणती काळजी घ्यावी ?  


  पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्विमिंग करताना स्वच्छ, क्लोरिंगयुक्त पाण्यामध्ये सराव करावा. यामुळे विषारी घटकांचा धोका कमी होतो. 
  
  पावसाळ्यात गर्दीच्या, उथळ, प्रवाही नसलेल्या, नियमित स्वच्छ न केल्या जाणार्‍या पाण्यामध्ये पोहणं टाळा. 
  
  आजारी असलेल्या लोकांनी सार्वजनिक स्विमिंग टॅंक किंवा पाण्याच्या साठ्यामध्ये पोहणं टाळावे. तसेच पाणी तोंडात जाणार नाही, गिळले जाणार नाही याची काळजी घ्या.