मुंबई : उन्हाळा सुरू झाला की घामांच्या धारा, घामोळ्यांचा त्रास, सनबर्न किंवा टॅनिंग यासारख्या समस्या वाढण्यांचं प्रमाणही अधिक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामानिमित्त काही जणांना उन्हांत फिरणं अटळ असतं पण यामुळे सनबर्नचा त्रास होऊ शकतो. सनबर्न कमी करण्यासाठी कोल्डप्रेसचा वापर फायदेशीर ठरू शकतो परंतू नकळत आपल्या काही नेहमीच्या सवयी या चूका अधिक गंभीर बनवू शकतात. सनबर्नमुळे त्वचेवर  येणार्‍या रॅशेस अधिक वेदनादायी होतात. म्हणूनच तुम्हांला सनबर्नचा त्रास होत असेल तर या गोष्टी कटाक्षाने टाळा. या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !


मुबलक पाणी पिणं -  


दाह होत असल्याने सनाबर्नच्या समस्येमध्ये त्वचेच्या बाहेरील स्तराचे नुकसान होते. त्यामुळे सहाजिकच त्वचा अधिक शुष्क बनते. उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनचा त्रास होतो. सनबर्नमुळे ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता होते. 


गरम पाण्याने आंघोळ -


सनबर्नच्या समस्येमुळे त्वचा हळूहळू शुष्क बनत जाते. डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाणी कमी होते तर प्रमाणापेक्षा अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील नैसर्गिक तेलाचे प्रमाणही कमी होते. यामुळे त्वचा अधिक सेन्सिटीव्ह आणि शुष्क होते.  वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर  


परफ्युम -  


रोझमेरी किंवा लॅव्हेंडरसारख्या परफ्युमचा वापर केल्यास त्वचा अधिक सूर्यप्रकाशात जाताना अधिक सेन्सिटीव्ह होते. bergamot देखील सनबर्नमुळे त्वचेवर आलेल्या रॅशेसला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे परफ्युमची निवड सांभाळून करा.  उन्हाळ्याच्या दिवसात परफ्युमची अचूक निवड करायला मदत करतील 'या' एक्सपर्ट टीप्स


सायट्रिक अ‍ॅसिड - 


सायट्रिक ज्युस त्वचेवर असल्यास आणि अशा अवस्थेतच तुम्ही सूर्यप्रकाशात गेल्यास त्वचेवर रॅशेस येणं, वेदना वाढणं, जळजळ जाणवणं हे प्रमाण अधिक वाढतं. सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!


औषधोपचार - 


नॉन स्टिरिऑईडल, दाहशामक औषधांचा वापर केल्यास सनबर्न अधिक गंभीर होतो.