मुंबई : प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी, फीटनेससाठी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी आहार, व्यायामाचं गणित सांभाळणं आहे. पण यासोबतच तुम्हांला झोपेचं चक्र सांभाळणंदेखील गरजेचे आहे. मात्र आपल्या काही सवयींमुळे झोपेमध्ये बिघाड होऊ शकतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणूनच चुकूनही झोपण्यापूर्वी या गोष्टी करू नकाच. 


चहा, कॉफी पिणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्यापुर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक आहे. कॅफीन घटकामुळे झोप बिघडते सोबतच रात्री सतत वॉशरूमला जाण्याची सवय बळावते. चहा सेवनाबाबातचे तुमच्या मनातील हे'4' आजच दूर करा ...


उशीरा जेवणं 


धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, व्यस्त कामामुळे अनेकांना रात्री घरी पोहचण्यास उशीर होतो. नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागत असल्याने अनेकांना रात्री जेवणाची वेळ पाळता येत नाही. रात्रीची झोप आणि जेवणाची वेळ यामध्ये वेळ पाळणं गरजेचे आहे. 


गोड पदार्थ टाळा 


रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय टाळा. जेवतानाही सुरूवातीला गोड आधी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखरेचे रक्तात रूपांतर करायला अधिक वेळ लागतो. यामुळे वजन वाढण्याचा धोका बळावतो. गोडावर ताव मारण्याआधी लक्षात ठेवा या ५ टीप्स ...


मोबाईलचा वापर 


रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करणं टाळा. मोबाईल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या स्क्रिनवरील रेडिएशनचा झोपेवर परिणाम होतो. म्हणून  झोपण्यापूर्वी तसेच जेवतानाही मोबाईल, टीव्ही स्क्रिनचा वापर टाळा. .. म्हणून जेवताना टी.व्ही पाहणं टाळाच