मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीराकडे योग्य लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सकाळच्या धावपळीत, घडाळ्याच्या काड्यावर चालताना चांगलीच धावपळ उडते. यात वर्किंग वूमन्स, गृहीणी, मुले, पुरुष सर्वांचाच समावेश आहे. 
पण या सगळ्या धावपळीत आरोग्याकडे नीट लक्ष दिले जात नाही. आणि कालांतराने मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण जीवनशैलीत शक्य तितके बदल करणे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल. तर रात्री झोपण्यापूर्वी या चूका करणे टाळा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# वेळेवर जेवणे अत्यंत गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा. शक्यतो घरी बनवलेले अन्नच खा. रात्री उशिरा जेवल्याने एकाग्रता बिघडते. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.


# पोट भरून जेवू नका. रोज तीन चपात्या खात असाल तर संध्याकाळी फक्त दोन चपात्या खा. चपाती कमी करुन त्याऐवजी सलाड, भाजी जास्त खा.


# रात्रीचे जेवण हलके असावे. अधिक फॅट आणि प्रोटीन असलेले अन्न पचण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याचबरोबर याचा परिणाम झोपेवरही होतो.


# अधिक मसालेदार खाल्याने रात्रीच्या वेळेस शरीरात पित्त वाढू लागते. मसालेदार जेवण चवीला उत्तम असले तरी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते.


# कमी मसालेदार आणि हलके जेवण जेवा. आठवड्यातून दोनदा खिचडी खा. त्यामुळे पोट हलके राहील.


# जेवताना टी.व्ही., मोबाईल दूर ठेवा. लक्ष देवून जेवल्याने, चवीने खाल्याने अन्न शरीराला लागते. म्हणजेच शरीराचे उत्तम पोषण होते.


# संध्याकाळच्या वेळेस चहा-कॉफी, धुम्रपान-मद्यपानापासून दूर रहा. 


# जेवल्यानंतर काही वेळ चाला. कमीत कमी २० मिनिटे चालणे गरजेचे आहे.


# झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी गरम दूध प्या. झोपण्यापूर्वी हात-पाय, तोंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चांगली झोप येईल.


# झोपण्याची योग्य वेळ ठरवा. त्याचवेळी नियमित झोपण्याचा प्रयत्न करा. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे उत्तम आरोग्याचे प्रतिक आहे.