मुंबई : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासाच्या दाव्यानुसार, एस्ट्राजेनेका लसीचा तिसरा डोस कोरोनाच्या वेरिएंटपासून संरक्षण देईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, एस्ट्राजेनेका लसीच्या दुसऱ्या डोसाच्या 6 महिन्यांनंतर बूस्टर डोस दिल्यास शरीरातील एंटीबॉडीजची पातळी वाढते. एस्ट्राजेनेका लस भारतात ही भारतात कोव्हिशिल्डच्या नावे दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ऑक्सफोर्डमधील संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, या लसीचे दोन्ही डोस कोरोनाविरूद्ध चांगलं काम करतील. त्यामुळे तिसर्‍या डोसची गरज कदाचित भासू नये. अभ्यासानुसार, एस्ट्राजेनेका किंवा फायझरच्या दोन डोसमुळे डेल्टा व्हेरिएंटमुळे रूग्णालयात दाखल करण्याची शक्यता ही 96 टक्क्यांनी कमी झाली होती.


दुसर्‍या नव्या अभ्यासात असं आढळले आहे की एस्ट्राजेनेकाचा एकच डोस शरीरात कमीतकमी एका वर्षासाठी एंटीबॉडी तयार करतात. तर, दोन डोस नंतर हे संरक्षण वाढतं. या नवीन अभ्यासात 90 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. हे सर्व सुमारे चाळीस वर्षांचे होते. या सर्वांनी ऑक्सफोर्ड लसीचा तिसरा डोस घेतला होता. यानंतर, एन्टीबॉडीजची पातळी तपासण्यासाठी त्यांच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला.


संशोधकांना असं आढळलं की, दुसऱ्या डोसाच्या तुलनेत तिसऱ्या डोसनंतर यूट्रलाइजिंग एंटीबॉडीमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढली होती. दरम्यान स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये संशोधकांनी टी-सेल्सचं उच्च प्रमाणही पाहिले. संक्रमणापासून बचाव करण्यासाठी टी-सेल्सची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रोफेसर पोलार्ड म्हणाले की, जर दक्षिण आफ्रिकेचा बीटा प्रकार यूकेमध्ये सुरू झाला तर बूस्टर शॉटचा वापर केला जाऊ शकतो.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, नवीन चाचण्या आवश्यक आहेत कारण बीटा वेरिएंट हे एक रूप आहे जे वॅक्सिनच्या इम्युनिटीपासून वाचू शकतं. म्हणूनच ही समस्या होण्यापूर्वी, त्यावर कार्य करण्यास सक्षम असलेली नवीन लस बनवणं चांगलं आहे.


प्रोफेसर पोलार्ड म्हणाले की, आता लोकांना तिसरा डोस देण्याची फारशी गरज नाही कारण लसींचा डबल डोस आधीच डेल्टा आणि अल्फा वेरिएंटविरोधात चांगलं काम करत आहे. सध्या युकेमध्ये जास्त प्रमाणात संरक्षणासाठी लसींचा तिसरा डोस देणे मान्य नाही, तर बर्‍याच ठिकाणी लसीचा पहिला डोस अद्याप दिला गेला नाही.