Diabetes Symptoms : वेळीच व्हा सावध ! मधुमेहाच्या सुरवातीला दिसतात `ही` 5 लक्षणं...
Early Diabetes Symptoms : अचानक अशक्तपणा जाणवणे. तीव्र भूक लागणे (hunger) ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणं आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर (High Blood Pressure) असतं तेव्हा शरीराला ग्लुकोजला (body glucose) मॅनेज करताना अडचण निर्माण होते. (weakness in diabetes)
Early Diabetes Symptoms : अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्याने मानवी शरीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. या आजारांमध्ये मधुमेहाचा क्रमांक सर्वात आधी लागतो. म्हणूनच जाणून घ्या मधुमेहाची दिसणारी प्राथमिक लक्षणे. (Initial diabetics symptoms)
लक्षण 1 – जास्तीत जास्त पाणी प्यावसं वाटणं. वारंवार लघवीला लागणं. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणं. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
लक्षण 2 – वजन घटणं – वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणं मधुमेहाला निमंत्रण देतं. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे. (weight loss in diabetes)
लक्षण 3 – अचानक अशक्तपणा जाणवणे. तीव्र भूक लागणे ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणं आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर (High Blood Pressure) असतं तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते. (weakness in diabetes)
लक्षण 4 – काम केल्यावर थकवा जाणवणे ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणं हा मधुमेहाचं लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसताच त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणं हळुहळू पूढे येतात.
लक्षण 5 – चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणं हेही मधुमेहाचं लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. सततचे डिप्रेशन, घराबाहेर पडण्याची ईच्छा न होणं, कामात लक्ष न लागणं हेसुद्धा मधुमेहाचं लक्षण मानलं जाते. (iriitation)
लक्षण 6 – नजर कमजोर होणे – मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अंधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते.
लक्षण 7 – शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर भरून न येणे. जखम चिघळत जाणे. जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
लक्षण 8 – पायाला सतत मुंग्या येणे. पायाला सतत मुंग्या येत असतील अधुनमधून पाय बधीर होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.