धक्कादायक ! कोरोना व्हायरसचा मेंदूवरही परिणाम?
सर्वात महत्वाचे अपडेट
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात आपलं जाळ पसरवलं आहे. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक देशांमधून कोरोनाला हरवण्यासाठी शोध मोहिम सुरू आता मात्र कोरोना त्याहून सर्वाधिक ताकदवान आहे. महत्वाचं म्हणजे हा कोरोना व्हायरस गळा, फुफ्फुसासोबतच डोक्यावर देखील परिणाम करतो.
अभ्यासानुरूप समोर आलं आहे की, कोरोनामुळे रूग्णाच्या बोलण्यावर देखील परिणाम पडत आहे. डोक्याला सूज येत असल्याकारणाने डोकेदुखी वाढत आहे. अशा प्रकारचे दुर्लभ प्रसंग समोर आले आहे. एवढंच नव्हे तर कोरोनामुळे सुगंध घेणं अथवा वेगवेगळी चव चाखण्याची क्षमता देखील कमी होती. जगातील अनेक न्यूरोलॉजिस्टने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. व्हायरसचा परिणाम मानवी मेंदूवर देखील होत आहे. तज्ज्ञांनी याला ब्रेन डिसफंक्शन म्हटलं आहे.
७४ वर्षांच्या वृद्ध रूग्णात आढळली लक्षणं
मार्च महिन्यात अशी एक गोष्ट समोर आली की, ७४ वर्षीय वृद्ध व्यक्ती आपली बोलण्याची क्षमता गमावून बसले. अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी खोकला आणि तापाचा त्रास होत होता. जेव्हा तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी निमोनिया असल्याचं सांगितलं.
औषध देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी देखील त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना श्वसनास त्रास जाणवत होता. त्यांची तब्बेत इतकी बिघडली की त्यांना डॉक्टरांना आपलं नाव सांगणही कठीण झालं. ज्येष्ठ व्यक्तीला सुरूवातीला फुफ्फुसाचा आणि पर्किंसनचा त्रास होता. तेव्हाच डॉक्टरांना अशी शक्यता वाटत होती की, या व्यक्तीला आणखी काही त्रास होऊ नये. कारण तोपर्यंत त्यांना या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची शंका वाटत होती. तपासणी केल्यावर या व्यक्तीला COVID-19 ची लागण झाल्याचं निदर्शनास आलं.