मुंबई : श्रावणाचा महिना जिथे एका बाजून पाऊस आणि हिरवळ असते तर दुसरीकडे संसर्ग आणि आजारांची भितीदेखील असते. या काळात कमजोर इम्युनिटी सिस्टीममुळे शरीर अनेक आजारांना बळी पडतं. यासाठी अशा वातावरणात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आयुर्वेदातदेखील श्रावण महिन्यात काही पदार्थ वर्जित करण्यास सांगितलंय. आपल्या शास्त्रामध्ये सात्विक भोजनाचा सल्ला देण्यात आलायं. यासाठी या महिन्यात अनेकजण लसूण, कांदा, मांसाहार खाणं सोडतात. शिव शंकराच्या आवडत्या महिन्यात शरीर स्वास्थ्याला त्रास होणारे कोणते पदार्थ खाणं टाळायला हवं याबद्दल जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरव्या पालेभाज्या : श्रावणात हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला अनेक त्रास उद्भवतात. पावसाळ्यात या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि किडे तयार होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा भाज्या खाल्ल्याने पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात.


वांगी : 


या सिझनमध्ये वांगी खाऊ नये. जर खायचीच असेल तर खूप काळजी घ्या कारण पावसात वांग्यावर किडे पडण्याचे प्रमाण जास्त आहे.


दूध :


श्रावणात दूध पिणंही त्रासदायक होऊ शकतं. या महिन्यात शंकरावर दूधाचा अभिषेक करण्याची मोठी परंपरा आहे. पण यामगचं वैज्ञानिक कारण पाहीलं तर या वातावरणात दूध प्यायल्याने पित्त वाढतं. दूधाऐवजी दही खाणं खूप गुणकाही मानलं जात.


मटण-मासे, कांदा आणि लसूण 


श्रावणात मटण-मासे, कांदा आणि लसूण खाण्यास मनाई केली जाते. तामसिक प्रकाराच्या भोजनाने अध्यात्माच्या मार्गात बाधा पोहोचून हानी पोहोचत असल्याचे म्हटले जाते.