Sexual Partners : आजंही आपल्या देशात सेक्स ( Sex ) म्हणजेच शारीरिक संबंध ( Physical Relation ) याविषयी खुलेपणाने बोललं जात नाही. दरम्यान सेक्सबाबत अधिक प्रमाणात माहिती नसल्याने बऱ्याचा चुकीमुळे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. अनेकदा सेफ सेक्स ( Safe Sex ) न केल्याने धोकादायक आजार होण्याचीही शक्यता असते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये याचसंबंधी प्रश्न नागरिकांना करण्यात आले. यामध्ये पुरुषांच्या सेक्स पार्टनरविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्वेक्षणात ( National Family Health Survey ) , भारतीयांमध्ये एचआयव्ही सारख्या गंभीर रोगाचा धोका समजून घेण्यासाठी नागरिकांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतानाचं वय, लैंगिक साथीदारांची संख्या यांची माहिती मिळाली. 


या सर्व्हेमधून ( National Family Health Survey ) एक धक्कादायक माहिती समोर आलीये. या माहितीनुसार, काही पुरुषांना घरात पत्नी असताना देखील बाहेर इतर महिलांशी संबंध ठेवले होते. नॅशनल फॅमिली हेल्थच्या सर्व्हेक्षणात ( National Family Health Survey ) असं सांगण्यात आलंय की, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर्स, जोडीदार किंवा घरात राहणाऱ्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी संबंध ठेवल्याने एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.


भारतीयांना किती सेक्शुअल पार्टनर्स आहेत?


या सर्व्हेक्षणात लोकांना विचारलेल्या प्रश्नांमधून महत्त्वाची माहिती मिळाली. या सर्वेक्षणात 15-49 वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांना त्यांच्या गेल्या 12 महिन्यांतील लैंगिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले गेले. यावेळी एक टक्क्या पेक्षा कमी महिला  (0.5 टक्के) आणि 4 टक्के पुरुषांनी माहिती दिली की, त्यांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय म्हणजेच पती-पत्नीशिवाय इतर व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवले होते. 


घराबाहेर राहिल्यावर लोकांची सेक्स लाईफ बदलते?


घरापासून एक महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ बाहेर राहिल्यानंतर लोकांच्या सेक्स लाईफमध्ये बदल होत असल्याचं या सर्व्हेक्षणातून दिसून आलं. यावेळी घरापासून दूर राहिल्यानंतर लोकांच्या सेक्शुअल पार्टनर्समध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते. 


या सर्वेक्षणात असंही दिसून आलंय की, जर स्त्रिया एका महिन्यापेक्षा जास्त काळ बाहेर राहिल्या असतील तर त्यांच्या सेक्शुअल पार्टनर्सची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढली होती. यावेळी 32 टक्के पुरुष घराबाहेर असताना संबंध ठेवतात, याची माहिती दिली. तर 56 टक्के मुलींनी कबूल केलं की, त्या घराबाहेर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात.