Health Tips : टरबूज हे बाराही महिने मिळणारं फळं आहे. पण हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्यात टरबूजचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. कारण टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असतं. त्यामुळे अशात टरबूजचे सेवन शरीरातील पाण्याची कमतरता दूर करुन शरीराला थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येक घरात टरबूज पाहिला मिळतो. बाजारात टरबूज लहान मोठ्या अनेक आकारात असतात. अनेक वेळा आपण मोठं टरबूज आणतो. जेणेकरुन दोन तीन दिवस त्याच सेवन करता येईल. अशावेळी आपण अर्धे टरबूज खातो आणि अर्धे कापून आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण तुम्हाला माहितीय तुमची ही चूक आरोग्यासाठी घातक ठरते. (this type of watermelon is more harmful than 5 cigarettes Health Tips in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञ सांगतात की, कापलेले टरबूज चुकूनही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. हे कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर खाल्ल्यास हे 5 सिगारेटपेक्षा जास्त हानिकारक ठरते. काय आहे यामागील कारण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. 


तज्ज्ञांच्या मते, कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवल्याने या फळाचे पौष्टिक मूल्य कमी होतं. टरबूजमध्ये लाइकोपीन, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि एमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात आढळतं. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर टरबूज हे सर्वात उत्तम फळ मानले जाते. टरबूज खाण्याचे खूप फायदे होतात. यामध्ये खूप कमी कॅलरीज असल्याने हे फळ खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहतं. 


कापलेले किंवा संपूर्ण टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चरने आपल्या संशोधनात उघड केलंय की खोलीच्या तापमानात साठवलेल्या टरबूजांमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या टरबूजांपेक्षा जास्त पोषक असतात.


रेफ्रिजरेटिंग कापरून ठेवलेला टरबूज हे जीवाणू एक प्रजनन ग्राउंड बनणतं. त्यामुळे टरबूज नेहमी पूर्ण खावे किंवा जर ते कापून ठेवायचं असेल तर रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता बाहेर उघड्यावर ठेवावं. या प्रकारचं टरबूज आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. 


ताज्या टरबूजमध्ये अमीनो ऍसिड असतात जे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात. शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. टरबूजमध्ये कॅलरीज कमी असतात आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतं.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)