मुंबई : कोणतंही ऑफीस घ्या. तिथे तुम्हाला विविध स्वभव वैशिष्ट्याचे लोक दिसतील. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे लोक असतात. एक अती कष्टाळू. दुसरे कामचुकार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे लोक कष्टाळू असतात ते सतत कामात असतात. यातही आणखी एक गंमत आहे. काही लोकांना ऑफीसमध्ये आपणच काम करतो असे वाटते. त्यामुळे आपण सतत कामात आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. त्यासाठी सहकाऱ्यांच्या कामात डोकाऊन पहायला, सहकाऱ्यांना न मागता सल्ले द्यायलाही ही मंडळी कमी करत नाहीत. तर, याऊलट दूसरी बाजू. जे भलतेच कामचुकार असतात. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की, या लोकांसोबत कसे काम करावे.


कामचुकार मंडळींचे काम करू नका


कामचुकार मंडळी सतत काम टाळण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते एकाच शिफ्टसाठी हटून बसतात. आपले काम पेंडीग कसे पडेल यासाठी ते अनेक क्लृप्त्या लढवत असतात. त्यासाठी ते अनेक प्रकारची कारणेही पूढे करू शकतात. अशा वेळी या लोकांची पेंडीग राहिलेली कामे सहकाऱ्यांवर पडतात. सहकारीही वरिष्ठांच्या दबावाला बळी पडून अनेकदा कामे करतात. पण, तुम्ही वेळीच नाही म्हणाल तर, अशा लोकांना आद्दल घडते. अशा लोकांची कामे शक्यतो तुम्ही करूच नका. जेव्हा इतर लोकांच्या कामाचा दर्जा दिसू लागतो तेव्हा ही मंडळीही बरोबर कामाला लागतात.


एकदा त्यांच्याशी बोलून घ्या


तुम्हाला जर तुमचा सहकारी कामचुकार आहे, असे वाटत असेल. तर आधी तुमच्या इतर सहकाऱ्यांचेही मत घ्या. काही दिवस निरिक्षण करा. मग त्याच्याशी बोलून घ्या. लक्षात ठेवा तो तुमचा सहकारी आहे. विरोधक नही. तेव्हा त्याच्याशी बोलताना आवाजाची पातळी सौम्य राखा. त्याच्यावर आरोप न करता मित्र म्हणून बोला. अनेकदा काम टाळणे ही त्या सहकाऱ्याची मूळ वृत्ती नसते. काही व्यक्तिगत अडचणी, ताण तणावांमुळेही त्याचे कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. ही फेज गेल्यावर तो दुप्पट वेगाने काम करू शकतो. तेव्हा सहकाऱ्याला समजून त्याच्याशी बोलून घ्या.


बॉसशी बोला


कोणत्याही कंपनीचा विकास ही सामुहीक जबाबदारी असते. जिला कामचुकार सहकाऱ्यांमुळे गालबोट लागते. अशा वेळी एखाद्या कर्मचाऱ्याबाबत तुम्हाला आक्षेप असेल तर, थेट बॉससोबत बोलून घ्या. इथेही लक्षात ठेवा एखाद्या सहकाऱ्याबाबत बॉसशी बोलताना भान बाळगा. बॉसशी बोलने म्हणजे सहकाऱ्याची कागाळी करणे, कारस्थान रचने नव्हे. वास्तवतेचे भान ठेऊन सत्य तेच मांडा. तुमच्या तक्रारीमुळे एखाद्याची नोकरी धोक्यात येऊ शकते. तक्रार करण्यापेक्षा निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करा. 
आपल्या कामचुकारपणाबद्धल सहानुभूती मिळत नाही हे लक्षात येताच हे लोक आळस झटकून कामाला लागलेले तुम्हाला दिसतील.