मुंबई : यकृत म्हणजेच लिव्हर हा मानवी शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं हे प्रमुख काम यकताद्वारे केलं जातं. तसंच शरीरातील अपायकारक विषारी घटकांचा निचरा करण्याचं कामंही यकृतामार्फत केलं जातं. यासाठीच यकृताचं आरोग्य उत्तम राखणं गरजेचं आहे. त्यामुळे यकृताचं आऱोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात खाली दिलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा.


नट्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध प्रकारच्या नट्सचा तुमच्या दिवसभरातील आहारात समावेश करा. नट्सच्या सेवनाने शरीराली व्हिटॅमीन इ मिळतं. शिवाय यामुळे यकृताच्या आजारांचा धोकाही कमी होतो.


ग्रीन टी


अनेकांना ग्रीन टीचा स्वाद आवडत नाही. मात्र ज्याप्रमाणे ग्रीन टी शरीरासाठी उत्तम असते त्याचप्रमाणे यकृताच्या आरोग्यासाठीही ग्रीन टी फायदेशीर ठरते. एका जापनीस अभ्यासाच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की, दररोज ग्रीन टी प्यायल्याने यकृताचं आरोग्य सुधारतं. ग्रीन टीमध्ये असणारं कॅटेचीन या घटकामुळे काही प्रकारच्या कॅन्सरचाही धोका कमी होतो.


कॉफी


काहींच्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या सीपने होते. हीच कॉफी यकृचाचं आरोग्य सुधारण्यासही मदत करते. संशोधनाच्या माध्यमातून कॉफीच्या सेवनाने कॅन्सर आणि लिव्हर सिरॉसिस(यकृताचा आजार) होण्याचा धोका कमी होतो.


बेरीज


कॅनबेरी आणि ब्लूबेरी या फळांमध्ये अॅन्टीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं. अॅन्टीऑक्सिडंटमुळे यकृताचं कार्य सुरळीत राहतं आणि यकृताचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.


ओमेगा 3 फॅटी अॅसिड


काही प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. यामुळे यकृताला सूज येण्याचा धोका कमी असतो. यकृताला सूज आल्यास यकृताचं कार्य बिघडतं. शिवाय यामुळे हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो.