नवी दिल्ली : शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची समस्याही होऊ शकते. त्यामुळे या सर्व समस्यांपासून वाचवण्यासाठी हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिटॅमिन सी -


हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात संत्रे, लिंबू, किवी, पेरुचा समावेश लाभदायक ठरु शकतो.


फॉलिक ऍसिड -


शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता झाल्यास, हिमोग्लोबिनची लेवलही कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लेवल उत्तम राखण्यासाठी फॉलिक ऍसिडचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. डाळ, कोबी, ब्रोकली, बदाम, मटार, केळी आहारात सामिल करु शकता.


व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स -


रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. 


डाळिंब -


डाळिंबामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह लोहदेखील चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डाळिंबामुळेही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.


हिरव्या पालेभाज्या -


हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीशिवाय, हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.


बदाम -


10 ग्रॅम ड्राय रोस्टेट बदाममध्ये 0.5 मिलीग्रॅम लोह असतं. त्याशिवाय बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमही असतं. बदामाच्या सेवनानेही हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.


हा आहार शक्यतो टाळा -


असाही आहार असतो जो लोह नष्ट करतो किंवा ब्लॉक करु शकतो. लोह आणि कॅल्शियम असा एकत्रित आहारही घेऊ नये. त्याशिवाय चहा, कॉफी, सोडा, वाईन, बीयर या गोष्टीही नियंत्रणात राखणं अत्यावश्यक आहे.