नवी दिल्ली : केसांमुळे सौंदर्यात भर पडते. लांबसडक, काळेभोर, घनदाट केस सर्वांनाच आवडतात. तसे केस आपलेही असावे, असे अनेकींना वाटते. यासाठी अनेक उपाय केले जातात. तुमची लांबसडक केसांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.


केसांना तेलाने योग्य मसाज करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसाज केल्याने केसांची मुळे मजबूत होतील आणि केसगळती कमी होईल.


केस वेळोवेळी ट्रिम करा


तुम्हाला जर लांबसडक केस हवे असतील तर ते वेळोवेळी ट्रिम करणेही गरजेचे आहे. त्यामुळे केस वाढण्याची क्षमता कायम राहते.


योग्य सप्लीमेंट घ्या


केस मजबूत होण्यासाठी योग्य सप्लीमेंट घ्या.


कंडीशनरचा वापर


चांगल्या कंडीशनरमुळे केसांना पोषकतत्त्व मिळतात. तसंच त्यामुळे केस चमकदार व मुलायम होतात.


केस थंड पाण्याने धुवा


केस गरम पाण्याने धुतल्यास निस्तेज होण्याचा धोका असतो. त्यामुळे शॅम्पू आणि कंडीशनर लावल्यानंतर केस थंड पाण्याने धुवा.