मुंबई : बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी कमी करणं हे अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं. बेली फॅट कमी करण्यासाठी किती वेळ लागतो हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. दरम्यान तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, पोटाचा घेर आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे म्हणजेच 15 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु त्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करणं तितकंच आवश्यक आहे.


योग्य आहार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. फायबर आणि प्रोटीन युक्त खाद्य पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करावा. त्यामुळे वजन तर कमी होतंच शिवाय पोटावरील अतिरिक्त चरबी देखील कमी होते.


कॅलरीजवर लक्ष ठेवा


सगळ्यात आधी तुम्ही घेत कॅलरीजवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज बर्न केल्या याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासोबतच योग्य आहार आणि एक्सरसाईज नियमित करणं आवश्यक आहे. तुम्ही जास्त वर्कआऊट केल्यास कॅलरीज बर्न होण्यास त्याचा फायदा होतो. 


व्यायाम महत्त्वाचा


पोटावरील अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी एक्सरसाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. फॅट कमी करण्यासाठी केवळ कार्डियो एक्सरसाईजवरच अवलंबून न राहता प्रभावी वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज देखील करणं गरजेचं आहे. यामध्ये एरोबिक्‍स, वेटलिफ्टिंग आणि रेजिस्टेंस ट्रेनिंग सारख्या एक्सरसाइज कराव्या.