वजन घटवताना हमखास होणारा स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी खास टीप्स
वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते.
मुंबई : वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नदेखील केले जातात. परंतू वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी एक्सपर्ट टीप्सदेखील नक्की लक्षात ठेवा.
हळूहळू वजन कमी करा:
पटकन वजन कमी केल्यास त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरच्या थरातील म्हणजेच डर्मिस मधील कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. म्हणून वजन हळूहळू कमी करा.
दररोज स्ट्रेचिंग करा:
दररोज हलकं स्ट्रेचिंग करा. त्यामुळे रक्तप्रवाह आणि त्वचेची इलॅस्टिसिटी सुधारते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सला आळा बसतो.
व्हिटॅमिन ए, सी आणि ई युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा :
त्वचेचे टिशू सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए चा फायदा होतो. व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती वाढते.
भरपूर पाणी प्या :
भरपूर पाणी प्या आणि स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते, त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता वाढते. म्हणून दररोज ८ ग्लास तरी पाणी प्या.
क्रीम किंवा लोशन वापरा :
कोलेजनचे प्रमाण वाढेल आणि स्ट्रेच मार्क्सला आळा बसेल असे क्रीम किंवा लोशन वापरा. ही क्रीम किंवा लोशन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे योग्य ठरेल.