समजूतदार पालक होण्यासाठी खास टिप्स...
आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
मुंबई : आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला स्वतः शांत आणि संयमी राहणे आवश्यक आहे. अनेकदा आपला कामावरचा किंवा इतर गोष्टींचा राग आपण मुलांवर काढतो. मग चिडचिड होते. या सगळ्यात तुम्हाला शांत पालक होण्यासाठी या टिप्स नक्कीच मदत करतील.
तुमचे मुल अनेक व्यक्तींना भेटत असते. त्यामुळे त्यांच्याकडून ते काही शिकत असते. परिणामी त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतात. अशावेळी जेव्हा तुम्हाला मुलांचे वागणे पटणार नाही तेव्हा त्यांच्यावर रागावण्याऐवजी मुलाला समजून घ्या आणि चुकीची जाणीव योग्य शब्दात करून द्या.
कधी कधी मुलं खूप जास्त दंगा मस्ती करतात. अशावेळी राग अनावर होतो. पण न रागवता दीर्घ श्वास घ्या. काही वेळाने मुलं शांत होईल तेव्हा कोमल शब्दात त्याची समजूत घ्याला.
मुलं जेव्हा जास्त हट्ट करते किंवा मस्ती करते. तेव्हा राग नियंत्रित ठेवणे शक्य नसल्यास दुसऱ्या खोलीत निघून जा. राग शांत झाल्यावर परिस्थिती हाताळा.
मुल खूपच मस्ती करत असेल तर एखादी सौम्य शिक्षा तुम्ही त्याला देऊ शकता. पण त्यानंतर त्याला कोमल शब्दात चुकीची जाणीव करुन द्या.
जर तुमचे मुल चिडले, रागावले असेल तर तुम्ही त्याच्यावर चिडू, रागावू नका. याऐवजी मुलाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होईल.