मुंबई : आजकालची जीवनशैली अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरात  करावी लागतात. मात्र ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे.  आरोग्य ही खरी संपत्ती आहे. तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करण्यास उत्साह वाटतो. परंतु, सध्याच्या थकाथकीत गळून गेल्यासारखे वाटते. अंग दुखते, थकवा जाणवतो. पण आहारात काही योग्य बदल केल्यास हा त्रास दूर होवून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. एकाच वेळी खूप न खाता थोड्या थोड्या वेळच्या अंतराने थोडं थोडं खा. 


२. ऑफिसमध्ये काम करताना चहा-कोफी ऐवजी गाजर, काकडी यांसारख्या भाज्या कच्या धुवुन खा. फळं किंवा भाज्या कापून न ख़ाता पूर्ण खाणे योग्य ठरेल. त्यामुळे त्याची पौष्टिकता टिकून राहते. 


३. प्रवासादरम्यान किंवा ऑफीसमध्ये आणि अगदी घरीही भूक लागली की बिस्कीटे किंवा खारी, टोस्ट यांसारखे पदार्थ चहासोबत किंवा नुसते खाणे टाळा. मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. 


४. काम उन्हात फिरण्याचे असेल तर जास्त घाम येतो आणि थकल्यासारखे वाटते. अशावेळी नारळ पाणी, फळांचा ज्यूस, लिंबाचे किंवा कोकम सरबत घ्यावे. कामानिमित्त बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बाटली ठेवावी. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी पित रहा. 


५. खाण्या-पिण्याच्या सवयींसोबत पुरेशी झोप देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. लवकर झोपणे आणि लवकर उठल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.


६. सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असल्यास नाश्ता करणे टाळू नका. त्याचबरोबर नाश्तात प्रोटीनचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास एनर्जी टिकून राहील. 


७.  जंक फूडमुळे  लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ टाळलेलेच बरे.