मुंबई :  उन्हाळ्याच्या दिवसात  भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपचन, मळमळ, पित्त, उलट्या होणं, डीहायड्रेशन, भोवळ येणं असा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात वाढणारी डोकेदुखी आणि पित्ताच्या त्रासावर नेमकी कशी मात करावी याबाबत तज्ञांनी काही खास टीप्स शेअर केल्या आहेत. 


कोणती काळजी घ्याल ?  


# उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक पाणी प्या. मूत्रविसर्जनाच्या वेळेस काही त्रास  न होता.त्याचा रंगदेखील अधिक  पिवळसर नसेल याची काळजी घ्या. पाण्यामुळे शरीराचे तापमान सुरळीत राहण्यास मदत होते.


# नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी कोकम सरबत आणि सब्जाचे मिश्रण मिसळून प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.


दुपारच्या जेवणात शक्य असल्यास दही भात खाण्याची सवय ठेवा. यामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिल मिळेल तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.


# रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद आणि दूधाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. दूध हे नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचे असल्याने शरिरातील उष्णता कमी करते तसेच शांत झोपण्यास मदत करते.


# उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास आंबा खाऊ शकता. आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक आढळते. यामुळे शरीरातील नसा शांत राहतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याची चव अवश्य चाखायला हवी.