मुंबई : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. पावसातील वातावरण अल्हाददायक असले तरी पावसाळ्यात अनेक समस्यांना समोरे जावे लागते. त्यातील एक म्हणजे कपड्यांना येणारा वास. पावसाळ्यात ऊन न मिळाल्यामुळे कपडे नीट सुकत नाहीत. कपडे काहीसे दमट राहतात. त्यामुळे कपड्यातून वास येऊ लागतो. पण या काही टिप्समुळे या समस्येपासून सुटका मिळेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# कपाटात कपडे लावताना महागडे कपडे वॅक्स पेपर किंवा प्लास्टिक पेपरमध्ये फोल्ड करुन ठेवा. त्यामुळे कपडे थेट कपाड्याच्या संपर्कात येणार नाहीत आणि खराब होणार नाहीत.


# पावसाळ्यात उन्हाच्या अभावामुळे कपडे नीटसे सुकत नाहीत. थोडे ओलसर राहीलेले कपडे घडी करून कपाटात ठेवण्याची चूक करु नका. असे दमट, ओलसर कपडे पूर्ण सुकेपर्यंत हवेवर ठेवा. 


# कपाटात कपडे लावण्यापूर्वी कपाट नीट स्वच्छ करा. साफ करण्यासाठी कापूरचे पाणी वापरा. त्यानंतर कपाट पूर्णपणे सुकू द्या आणि त्यानंतर त्यात कपडे ठेवा.


# कपड्यांना वास येऊ नये म्हणून बेकींग सोड्याचाही वापर करु शकता. कपडे धुताना त्यात थोडा बेकींग सोडा घाला. त्यामुळे कपड्यांना वास येणार नाही.


# कपडे कपाटात ठेवताना वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवा. त्याचबरोबर कपाटात नेप्थलीनच्या गोळ्या ठेवा.