या खास टिप्ससंगे नेहमी दिसा तरुण!
आपले वय कधीच वाढू नये किंवा तसे आपल्या शरीरावरुन वा चेहऱ्यावरून दिसू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
मुंबई : वय वाढणे सामान्य आहे. पण आपले वय कधीच वाढू नये किंवा तसे आपल्या शरीरावरुन वा चेहऱ्यावरून दिसू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. वाढते वय लपवण्यासाठी अनेकजण विविध पर्याय स्वीकारतात. तर त्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. पण काही साध्या सोप्या टिप्सने तुम्हाला तुमचे तारुण्य राखता येईल. फक्त त्यासाठी त्या प्रयत्नात सातत्य असणे गरजेचे आहे.
चेहऱ्यावर वाढते वय दिसण्यास डिहायड्रेशन खूप प्रमाणात जबाबदार ठरते. म्हणून भरपूर पाणी प्या. रोज कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यायला हवे.
ताण तणावामुळे शरीरावर, चेहऱ्यावर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे ताणविरहीत राहणे गरजेचे आहे. ते साध्य करण्यासाठी ध्यान, प्राणायाम करा. मसाज, अरोमाथेरपीचा ही तुम्ही प्रयोग करु शकता. त्यातून शरीराला ऊर्जा प्रदान होईल.
दिवसाच्या सुरुवातील त्वचेवर सौम्य क्लिंजर वापरा. त्यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
त्यानंतर अल्कोहोल फ्री टोनर लावा. त्यामुळे त्वचेला सौम्यता येईल. त्यानंतर सीरम किंवा मॉईश्चराईजरचा वापर करा.
व्हिटॉमिन सी, ग्लिसरीन युक्त टोनरचा वापर करा.
मॉईश्चराईजरमुळे त्वचेला आर्द्रता मिळते. त्वचा कोमल आणि स्वस्थ राहते.
कोलेजन आपल्या त्वचेला, केसांना आणि नखांना मजबूती प्रदान करते. त्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
अंक्टीऑक्सिडेंट, व्हिटॉमिन ए, सी, ई आणि बीटा कॅरोटीन शरीरासाठी आवश्यक पोषकघटक आहेत. त्यामुळे त्वचेचे आरोग्यही राखले जाते.
लव्हेंडर, अनार, चंदन तेलामुळे त्वचेवर चमक येते आणि सुरकूत्या दूर होतात.
त्वचेची काळजी घेण्यास सनस्क्रीम महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे हानिकारक सुर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
त्याचबरोबर वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये असे वाटत असल्यास धुम्रपान, मद्यपानापासून दूर रहा.
प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळा.