मुंबई : सलाड म्हटलं की आपल्याला काकडी आठवते. काकडीत अनेक आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म असतात. उन्हाळ्यात तर काकडी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. जेवणासोबत कापलेली काकडी असल्यावर जेवणाची रंगतही वाढते. मीठ मसाला लावून काकडी खाणे तर अनेकांना आवडते. काकडीचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. म्हणजेच काकडी खाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. डिहाड्रेशनपासून बचाव होण्यासाठी काकडी अतिशय उपयुक्त ठरते. काकडीत व्हिटॉमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स असतात. काकडीमुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    काकडी आरोग्यासाठी कितीही चांगली असली तरी काही वेळेस ती कडू निघते. अशावेळी काकडीचा कडवटपणा दूर करण्यासाठी काकडीचे दोन भाग करा. त्यावर मीठ चोळा. सफेद फेस निघेल. असे २-३ वेळा केल्याने काकडीचा कडवटपणा निघून जाईल.

  • काकडीची साल काढूल फोर्कच्या मदतीने काकडीला छिद्र पाडा. त्यानंतर काकडी धुवून खा. असे केल्यानेही काकडीचा कडवटपणा दूर होईल.

  • काकडीचा कडवटपणा दूर करण्यासाठी काकडी एका बाजूने थोडीशी वरच्या बाजूने कापा. त्यानंतर त्यावर मीठ लावा. त्यावर कापलेला तुकडा लावून गोलकार फिरवा. फेस तयार होईल. दुसऱ्या बाजूनेही असेच करा.