उन्हाळ्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची अशी घ्या काळजी!
उन्हाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या वर डोके काढू लागतात.
मुंबई : उन्हाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या वर डोके काढू लागतात. हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन, फ्लू, चिकन पॉक्स, डायरिया यांसारख्या समस्या वाढू लागतात. अशा समस्यांपासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची अशी काळजी घ्या.
हे त्रास उद्भवतात
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेशन होते. याचे कारण अधिक व्यायाम, डायरिया, उलटी, ताप असू शकते.
या काळात कांचण्या (चिकनपॉक्स) ची समस्या उद्भवतात.
युरीन इंफेक्शन ही सामान्यपणे आढळणारी समस्या. साधारणपणे महिलांना हा त्रास अधिक जाणवतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने इंफेक्शन होते.
अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात पाणी उकळवून प्या. कारण त्यामुळे डायरिया, टायफाईड यांसारख्या आजारांना आळा बसतो.
भरपूर पाणी प्या.
जंक फूड, रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका.
फळे, पालेभाज्या, दही, ताक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
तहान क्षमवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्सऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत पिणे आरोग्यदायी ठरेल.