या टिप्सने उन्हाळ्यात करा घाम व दुर्गंधीपासून केसांचे संरक्षण!
उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे.
मुंबई : उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. पण हा घाम केसांच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतो. त्वचेवरील घाम चकटन पुसता येतो किंवा वारंवार तुम्ही चेहरा पाण्याने धुवू शकता. पण केसांचे काय? त्यामुळे केसात येणारा घाम ही मोठी समस्या होऊन जाते. यावर काही उपाय त्यामुळे तुम्ही घाम आणि त्यामुळे येणारी दुर्गंधी यापासून तुम्ही सुटका मिळवू शकता.
गुलाबपाणी
डोक्याची त्वचा हेल्दी आणि ऑईल फ्री राहण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा केसांना गुलाबपाणी लावून धुवा. गुलाबपाण्यामुळे केसांना थंडावा मिळतो आणि डोकेदुखी व इतर समस्याही दूर होण्यास मदत होते.
स्टायलिंग मशीन्सचा वापर टाळा
केस स्टायलिश ठेवण्यासाठी मशीन्सचा प्रयोग करणे सामान्य आहे. पण उन्हाळ्यात अधिक हिट असलेल्या मशीन्समुळे डोक्याच्या त्वचेला नुकसान पोहचू शकते.
इसेंशिअल ऑईल
केसांना मालिश करण्यासाठी इसेंशिअल ऑईलचा वापर करा. त्यामुळे डोक्यावरील त्वचा स्वास्थ्यपूर्ण राहते. त्याचबरोबर केसांचे पोषण होऊन केस मजबूत होतील.
धूळ, ऊन यापासून केसांचे संरक्षण करा
शक्य तितके केसांचे संरक्षण करा. त्यासाठी घराबाहेर पडताना केसांना स्कार्फ गुंडाळा. तसेच आठवड्यातून तीनदा केस स्वच्छ धुवा.