मुंबई : दही खाणे आरोग्यास लाभदायी ठरते. यातील पोषकघटक पोटांच्या अनेक समस्या दूर ठेवतात. तर दही खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. दह्याचे अनेक फायदे आहेत पण दह्यासोबत हे पदार्थ खाल्यास त्याचे फायदे दुप्पट होतील. कोणते आहेत ते पदार्थ, या जाणून घेऊया...


दही आणि ओवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दही आणि ओवा एकत्र मिसळून खाल्यास दातांच्या समस्यांपासून सुटका होते. त्याचबरोबर तोंड आले असल्यास म्हणजे माऊथ अल्सरवरही दही आणि ओवा खाल्याने फायदा होतो.


दही आणि काळीमिरी


दही आणि काळीमिरी खाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय केसगळतीच्या समस्येवर हा अतिशय फायदेशीर उपाय आहे. तीन चमचे दह्यात दोन चमचे काळीमिरी पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. केस मुलायम होतील.


दही आणि ओट्स


दह्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी दही फायदेशीर ठरते. दह्यात ओट्स घालून खाल्याने याचे फायदे द्विगुणित होतात. दात व नखे मजबूत होतात.


दही आणि जिरे


दह्यात जिरे मिसळून खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी पाच ग्रॅम दह्यात एक चमचा जिरा पावडर घालून खा. लाभदायी ठरेल.