मुंबई : डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. काही लोक अगदी आमटी-भाजीतील कडीपत्ता शोधून खातात. तर काही तो दिसताच बाजूला काढतात. परंतु, कडीपत्ताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचबरोबर सौंदर्याच्या समस्या दूर करण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो. पाहुया त्याचे फायदे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# कडीपत्ता आयर्न आणि फॉलिक अॅसिडचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे अॅनेमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता आणि खजूर खाल्याने देखील खूप फायदा होतो.


# पचनासंबंधित समस्या असल्यास कडीपत्ता वाटून ताकात घालून प्या. यामुळे पोटात होणारी गडबड शांत होते आणि पोटाच्या समस्यांचे निवारण होते. 


# मधुमेहींनी आहारात कडीपत्ताच्या समावेश केल्यास ब्लड शुगरची समस्या दूर होण्यास मदत होईल. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.


# केस काळेभोर, मजबूत करण्यासाठी कडीपत्ताचा हा प्रयोग करुन पहा. यासाठी खोबरेल तेलात कडीपत्ता उकळवा. थंड झाल्यावर ते तेल केसांना लावून मालिश करा.


# कफ झाल्यास किंवा कफ सुकल्यास वा फुफ्फुसात जमा झाल्यास यावर कडीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. यासाठी कडीपत्ता वाटून त्याची पावडर करा आणि मधासोबत त्याचे सेवन करा. 


# त्वचासंबंधित समस्यांवर कडीपत्ता फायदेशीर ठरतो. खूप काळापासून पिंपल्स किंवा त्वचेच्या अन्य समस्यांमुळे त्रासले असला तर रोज कडीपत्ता खा किंवा त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा.