मुंबई : अनेकदा घाईत आंघोळ आटपण्याच्या सवयीमुळे त्वचेवर साचलेला मृत पेशींचा थर आणि मळ यामुळे त्वचा काळवंडत जाते. प्रामुख्याने मानेजवळ हा काळसरपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो. वेळीच मान स्वच्छ न केल्यास त्वचा अधिक खराब होऊ शकते. म्हणूनच या घरगुती उपायाने काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्यास फायदेशीर ठरते.  


टोमॅटो फायदेशीर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळवंडलेली मान पुन्हा उजळवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो. टोमॅटोमध्ये अ‍ॅसिड, मुबलक अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक आणि टॅनिंग दूर करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचेवरील काळसर  थर कमी करण्यास मदत होते. घरगुती ब्लिचिंग पॅकमध्ये दह्यासोबत, दलिया आणि टोमॅटोचा रस मिसळा. या पॅकने त्वचेवर हलका मसाज केल्याने त्वचेवरील राप काढण्यास मदत होते. त्वचा अधिक मुलायम आणि तजेलदार होण्यास मदत होते.  


 बटाटा ठरेल जादुई उपाय 


त्वचेवरील काळसरपणा कमी करण्यासाठी बटाटयाचा रसदेखील फायदेशीर ठरू शकतो. बटाट्यातील केटी कोलिंस घटक त्वचेवरील काळसरपणा कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात. नियमित आंघोळीपूर्वी किमान दहा मिनिटे बटाट्याच्या रसाने मसाज करा. या रसासोबत लिंबाचा रस मिसळल्यास काळवंडलेली त्वचा अधिक लवकर पुन्हा तजेलदार होते.  काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय