काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय

आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रवासादरम्यान सतत धूळ, धूर, प्रदूषण यांचा मारा होत असल्याने शरीरावर त्याचा राप बसतो. 

Dipali Nevarekar & Updated: Apr 14, 2018, 10:15 AM IST
काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय  title=

मुंबई : आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रवासादरम्यान सतत धूळ, धूर, प्रदूषण यांचा मारा होत असल्याने शरीरावर त्याचा राप बसतो. 
प्रामुख्याने मानेच्या मागील बाजूवर घामामुळे डेड स्क्रीनचे स्तर अधिक जाडसर बनत जातात. वेळोवेळी मान स्वच्छ न केल्यास ते स्प्ष्ट दिसतात. खुल्या गळ्याचे टीशर्ट घातल्यानंतर असे डेडस्कीनचे थर दिसणं लज्जास्पद आहे. 
गळ्याभोवती दिसणारा हा काळ राप दूर करण्यासाठी पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट्स घेण्याऐवजी या काही  घरगुती उपायांचा वापर करा. 

कोणते आहेत घरगुती उपाय ? 

बेसन 

त्वचेला नैसर्गिकरित्या तजेलदार करण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. प्रामुख्याने नैसर्गिक स्वरूपातील स्क्रबर म्हणून बेसन वापरले जाते. 
बेसनाची पेस्ट करून माळेवर चोळल्याने मृत त्वचेचा थर कमी होतो. हळूहळू  काळपटपणा कमी होतो. नियमित 3-4 दिवस हा उपाय नियमित केल्याने तुम्हांला सकारात्मक परिणाम दिसायला मदत होईल.  

लिंबू 

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. आवश्यक व्हिटॅमिन सी शरीरात गेल्यास प्रतिकारकक्षमता सुधारण्यास मदत होते. मात्र लिंबातील अ‍ॅसिडिक गुणधर्म त्वचेला उजळण्यासही मदत करते  हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

तुमची त्वचा संवेदनशील नसेल तर कोपरा, गुड्घे, घोटा आणि मानेच्या मागील भागावर मृत त्वचेचा राप बसल्याने काळवंडलेली त्वचा पुन्हा चमकदार आणि तजेलदार करण्यासाठी मदत होते. 
15 मिनिटं लिंबाचा रस लावून ठेवा. त्यानंतर मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. एखादी जखम असल्यास, कापलेले असल्यास लिंबाचा रस लावू नका.  

बटाटा 

बटाट्यामध्येही त्वचेचा  काळपटपणा कमी करण्याची क्षमता असते. टॅनिंगचा त्रास दूर करण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे. त्यामुळे बटाटा किसून त्याचा रस मानेवर चोळा. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा पुन्हा स्वच्छ करा. बटाट्यातील केटाकोलिस नामक एंजाईम्स त्वचेचा रंग खुलवण्यास मदत करतात. यामुळे नैसर्गिक स्वरूपात त्वचेला पुन्हा तजेलदारपणा येतो. 'या' घरगुती पॅकने कमी होईल काळवंडलेल्या कोपर्‍याची आणि ढोपर्‍यांची समस्या