toothpaste to use: आरोग्य जपताना अन्नाचं नीट पचन होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी गरजेचं आहे अन्न नीट चावलं जाणं. म्हणजे तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर तुमचे दातही निरोगी असायला हवेत. आजकाल खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे दातांचे आरोग्य राखणे खूप गरजेचे आहे. तसेच कमकुवत दातांमुळे तुम्हाला दात पिवळे पडणे, दातातील पोकळीची समस्या, दात कमकुवत होणे, दुखणे किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या अशा अनेक समस्या किंवा आजारांना सामोरे जावं लागत. यावर पर्याय म्हणून आपण जास्त टूथपेस्ट वापर करतो.  तसेच बर्‍याच लोकांना वाटते की जास्त टूथपेस्ट वापरल्याने दातांची चांगली स्वच्छता होऊ शकते पण तसे नाही. दातांव्यतिरिक्त टूथपेस्टच्या अतिवापरामुळे तोंडाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. टूथपेस्ट लहान मुले आणि प्रौढ दोघांसाठी सारखीच वापरली जाते, परंतु मुलांचे दात नाजूक आणि कमकुवत असतात, त्यामुळे ते लवकर खराब होतात. दातांना स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती टूथपेस्ट आवश्यक आहे?


Health.com च्या मते, टीव्हीवर किंवा जाहिरातींमध्ये दिसणारे टूथपेस्टचे प्रमाण लोकांना जाहिरातींची माहिती देण्यासाठी असते. सर्वसाधारणपणे, एवढी टूथपेस्ट (toothpaste) वापरल्याने तोंडाच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या व्यक्तीने एका वेळी फक्त मटारच्या आकाराची टूथपेस्ट वापरली पाहिजे आणि ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवर देखील लिहिलेली आहे. ज्याकडे कोणाचे लक्ष जात नाही.


मुलांसाठी हानिकारक असू शकते


जास्त प्रमाणात टूथपेस्ट (toothpaste) वापरल्याने मुलांचे सर्वाधिक नुकसान होते. जास्त प्रमाणात वापरल्याने मुलांच्या दुधाचे दात खराब होऊ शकतात. याचे कारण असे की, जेव्हा फ्लोराईड जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा ते विकसनशील दातांवर फ्लोरोसिस नावाची कॉस्मेटिक स्थिती निर्माण करू शकते. कॉस्मेटिक समस्यांमुळे दातांवर पिवळे आणि तपकिरी डाग पडू शकतात. तसेच काही वेळा दातांमध्ये खड्डे देखील होऊ शकतात. म्हणूनच प्रत्येकाने, मग तो मोठा असो किंवा लहान, प्रत्येकाने वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.


वाचा: 'या' फुलाचा हार, गजऱ्यांसाठीच नाही तर, Diabetes ला कंट्रोल करण्यासाठीही वापर, परिणाम दिसेल एकदम झटपट  


कमी टूथपेस्ट वापरल्यानेही समस्या उद्भवू शकतात


खूप कमी टूथपेस्ट (toothpaste) वापरल्याने देखील समस्या उद्भवू शकतात. अपुरी टूथपेस्ट फोम किंवा बुडबुडे तयार करू शकत नाही, ज्यामुळे दात व्यवस्थित साफ होणार नाहीत. याशिवाय दातांच्या संरक्षणासाठी फ्लोराईड(Fluoride) पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. दात साफ करताना तोंडात पाणी घालू नका कारण फ्लोराईड दातांवर कार्य करण्यास वेळ घेते. जर तोंडात पाणी असेल किंवा ब्रश खूप ओला असेल तर ते काम करू शकणार नाही.


माउथवॉश वापरा


तोंडाच्या स्वच्छतेसाठी ब्रश करण्याव्यतिरिक्त माउथवॉशचा (mouthwash) वापर करा. त्यामुळे फ्लोराईडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासोबतच दात आणि तोंड दोन्ही जंतूमुक्त राहतील. दात स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे. आपण दंत आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.