मुंबई : नवजात, निरागस बाळाकडे केवळ काही वेळ पाहत राहिल्यानेही तुमचा दिवसभराचा सारा थकवा दूर होतो. अनेकदा नवजात बाळ आईप्रमाणे दिसतो की बाबांप्रमाणे दिसतो? याबाबत अंदाज लावले जातात. पण तुम्हांला ठाऊक आहे का? काही गोष्टींवर बाळाच्या वडिलांचा थेट प्रभाव दिसतो.  


डोळ्यांचा रंग  - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळाचे फिचर्स हे जेनिटिक्सवर अवलंबून असले तरीही अनेकदा बाळाच्या डोळ्यांचा रंग हा वडिलांच्या रंगांप्रमाणे असल्याचे आढळून येते. 


केस - 


अनेकदा घरातील आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांना पाहून त्यांच्या मुलाच्या लहानपणाची आठवण होते. अनेकदा नवजात बाळाच्या केसांचा रंग हा वडिलांच्या केसांप्रमाणे असल्याचे आढळून येते. 


झोपण्याची स्थिती -


लहान मुलांच्या प्रत्येक बारीक हालचालींवर आईचं लक्ष असत. लहान बाळ अधिकवेळ आईजवळ असते. मात्र त्याची झोपण्याची स्थिती ही त्यांच्या बाबाप्रमाणे असण्याची शक्यता दाट असते. 


उंची आणि वजन - 


अनेकदा मुलांचं वजन, उंची यावर बाळाच्या बाबांचा प्रभाव अधिक असल्याचे आढळून येते. बाळांमध्ये वडिलांमधून येणारी जेनिटिक्स अधिक प्रभावी ठरतात. 


खळी - 


बाळाची चेहरेपट्टी वडिलांप्रमाणे असल्यास त्यांच्यामध्ये वडिलांप्रमाणे खळी पडण्याची शक्यतादेखील अधिक असते.