Treatment for low sperm count: शुक्राणूंच्या कमतरतेमुळे अनेकांना मुल-बाळ होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. एखाद्या पुरुषात शुक्राणूंची कमतरता असल्यास, अशा पुरुषांना पित्याच्या सुखापासून वंचित राहावं लागतं. अनेकदा वेगवेगळ्या पद्धती वापरून किंवा वेगवेगळे उपचार करूनही त्याचा फायदा होत नाही. मात्र यावर आता इलाज संभव आहे. इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन ( intracytoplasmic sperm injection - ICSI) पद्धतीचा वापर करून स्पर्मची संख्या वाढवता येऊ शकते.  


या पध्दतीबाबतचे समज-गैरसमज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन पद्धतीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. या पद्धतीच्या वापराने बाळावर परिणाम होतो, असं बोललं जातं. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.  


इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे नेमकं काय? 


IVF तज्ज्ञ डॉक्टर यांनी याबाबत माहिती दिली. ICSI इक्सी ही एक अत्याधुनिक पद्धती आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असल्यास या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. या पद्धतीत महिलांच्या अंडकोशाला शरीरातून बाहेर काढून लॅबमध्ये पुरुषांच्या शुक्राणूत इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन पद्धतीचा वापर करून इंजेक्ट केलं जातं. यानंतर हा गर्भ पुन्हा महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात येतो. शुक्राणूंची कमतरता, मंद गती, खराब गुणवत्ता किंवा मृत शुक्राणू असल्यास ही पद्धती फायदेशीर ठरते असं डॉक्टर सांगतात. 


वातावरणातील प्रदूषणामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. विषारी हवेत श्वास घेण्याने पुरुषांमधील शुक्राणूंवर परिणाम होतो. अशात  शुक्राणूंची संख्या कमी होण्यासारखे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. म्हणूनच अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही. 


स्पर्म काऊंट कमी होण्याची कारणं काय? 


IVF तज्ज्ञ याबाबत सांगतात की, पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होत चालली आहे. तुमची सेक्सची इच्छा कमी होणं हे यामागील एक प्रमुख लक्षण आहे. PM 2.5 आणि PM10 सारखे विषारी कण आपल्या केसांपेक्षा 30 पटीने बारीक असतात. अशा विषारी हवेत जेंव्हा आपण श्वास घेतो तेंव्हा हे विषारी कण आपल्या फुफुसात साठून राहतात. यासोबत शरीरात कॉपर, लेड, झिंक यासारखे घटकही जातात. जास्त काळासाठी आपण या विषारी हवेत श्वास घेत असू, तर आपल्या सेक्सच्या इच्छेवर, टेस्टस्ट्रॉन आणि स्पर्म सेल निर्मितीत कमतरता येते. 


treatment for low sperm count intracytoplasmic sperm injection ICSI