व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
जिम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण आज आरोग्य तज्ज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत.
Raju Srivastav Heart Attack : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना जिममध्ये(Gym) व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कमी वयात अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा घटना आपण पाहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकलं असेल की जिम करणारे आणि व्यायाम प्रेमी लोकांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अनेक लोकांच्या समोर हा प्रश्न पडला आहे की, जिममध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य? जिम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण आज आरोग्य तज्ज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत. (trending news raju srivastava health update how excess workout cause heart attack in marathi)
जिमला जाणे योग्य की अयोग्य?
आम्ही आरोग्य तज्ज्ञांशी यासंदर्भात बोलो तर त्यांचा मते, गेल्या काही वर्षांपासून देशात बैठी जीवनशैलीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना काळात गेल्या 2 वर्षात घरातून वर्क फ्रॉम होम करताना लोक तासंतास एका जागेवर बसून काम करत आहे. ऑफिसमध्येही अगदी 9 ते 10 तास एका जागेवर बसून लॅपटॉप किंवा पीसीसमोर काम केलं जातं आहे. या अशा जीवनशैलीला बैठी जीवनशैली म्हटलं जातं.
बैठी जीवनशैली सोबत अनेक अशा चुका लोक करत आहेत. ज्यात शरीराला कुठलाही व्यायाम न करणे. अगदी गाडी आणि लिफ्टमधून प्रवास त्यामुळे चालणे होत नाही. त्याशिवाय खाण्यापिण्याची चुकीची सवय अशामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
जिम आणि हृदयविकाराचा काय संबंध?
आता आपण बोलूयात व्यायाम प्रेमी लोकांबद्दल. तर अनेक लोकांना अचानक जिमला जाऊन व्यायाम करण्याचा साक्षात्कार होतो. अशात फिट आणि बॉडी बनविण्यासाठी लोक जीममध्ये भरपूर वेळ घालवतात. बॉडी बनविण्याच्या नादात Heavy एक्साइज करतात. ट्रेडमिलवर जास्त जास्त वेळ गतीने धावतात. या चुकीमुळे त्यांचा हृदयावर भार वाढतो. अशामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. तसंच तरुणामध्ये योग्य प्रकारे जिममध्ये व्यायाम न केल्यामुळे त्यात योग्य पद्धतीने आणि हेल्दी डाएट न घेतल्यामुळे कमी वयात हृदय विकाराचा त्रास दिसून येत आहे.
या सवयी लगेचच सोडा अन्यथा...
हृदयविकाराचा झटका येण्यामागे हाइ ब्लड प्रेशर आणि हाइ कोलेस्ट्रॉल हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय या सवयीसुद्धा हृदयविकारासाठी कारणीभूत असतात. जर तुम्हाला या सवयी असेल तर त्वरित ती सोडा.
1. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन
2. धूम्रपान
3. मद्यपान
4. अधिक तणाव घेण्याची सवय
5. जास्त फॅटयुक्त पदार्थांचं सेवन
6. एका जागेवर तासंतास बसून काम करणे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)