Heart Attack And Gym : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना जिममध्ये(Gym) व्यायाम करताना हृदयविकाराचा झटक्याने जगाचा निरोप घेतला. याशिवाय टीव्ही जगतातील कलाकार  सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Veer Suryavanshi) यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जिममध्ये वर्कआऊट करताना एका हॉटेल मालकाचा आणि एका डॉक्टराचा बळी गेला आहे. या शिवाय सलमान खानचा (Salman Khan) बॉडी डबल सागर पांडेचाही (Sagar Pandey) जिममध्ये वर्कआऊट (gym Work out ) करताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack ) मृत्यू झाला. अशातच जिममध्ये वर्कआऊट दरम्यान काय चुका टाळल्या गेल्या पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही जिममध्ये वर्कआऊट करतान या चुका करत असाल तर त्वरित त्याला आळा घाला. 



स्टिरॉइड्समुळे धोका अधिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजची तरुण पिढी बॉडी बनविण्यासाठी अनेक वेळा स्टिरॉइड्सचा (Steroids) वापर करते. या स्टिरॉइड्सचा भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं. स्टिरॉइड्सचा वापरामुले हृदयविकाराचा धोका वाढतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. शिवाय स्टिरॉइड्सचा परिणाम हा फक्त हृदयावर नाही तर यकृत, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी घातक आहे. (trending news why Heart Attack happening during gym workouts marathi news)


अति व्यायाम हे देखील एक कारण 


फूट आणि स्लीम राहण्यासाठी अनेक जण तासांतास जिममध्ये वेळ घालवतात. अशात अति व्यायाम हे देखील मृत्यूचे सर्वात मोठं कारण आहे, असं तज्ञ्जांचं मत आहे. अतिशय वेगाने आणि अति वर्कआऊटमुळे तुमच्या शरीरावरील ताण वाढतो.


कोरोनाची लसचा (Corona vaccine) परिणाम? 


अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये कोरोनाच्या mRNA लसीवरील संशोधनात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानुसार 18 ते 39 वयोगटातील पुरुषांना कोविड एमआरएनए लस न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण कोरोना महासंकटानंतर हृदयाशी संबंधित आजारांमध्ये मृत्यूंचा संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या संशोधनातील डॉ. जोसेफ ए. लाडोपा म्हणतात की, या लसीमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधीत मृत्यूचा धोका वाढतो. 


WHO यांचं काय म्हणं आहे? 


गेल्या काही दोन वर्षांमध्ये भारतात हृदयविकाराचा झटका ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. तरुणांना या आजाराने गाठल्यामुळे याचं भयानक रुप पाहून आरोग्यतज्ज्ञंही चिंतेत आहे. WHO नुसार  जागतिक स्तरावर हृदयविकारामुळे होणाऱ्या 17.9 दशलक्ष मृत्यूंपैकी एक पंचामांश मृत्यू हे भारतात होतात. याचा अर्थ एकट्या भारतात 25 हजार लोकांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे बळी गेला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 70% लोकं हे 30 ते 60 वयोगटातील आहेत. 


या सवयी लगेचच सोडा अन्यथा...


हृदयविकाराचा झटका येण्यामागे हाइ ब्लड प्रेशर आणि हाइ कोलेस्ट्रॉल हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय या सवयीसुद्धा हृदयविकारासाठी कारणीभूत असतात. जर तुम्हाला या सवयी असेल तर त्वरित ती सोडा. 
1. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन
2. धूम्रपान
3. मद्यपान
4. अधिक तणाव घेण्याची सवय
5. जास्त फॅटयुक्त पदार्थांचं सेवन
6. एका जागेवर तासंतास बसून काम करणे


 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)