एकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप लागत नाही...करा हा उपाय
जर तुम्हाला सकाळी लवकर उठून जायचे असेल आणि रात्री मध्येच झोपमोड झाली तर झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
मुंबई : जर तुम्हाला सकाळी लवकर उठून जायचे असेल आणि रात्री मध्येच झोपमोड झाली तर झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
एकदा झोपमोड झाल्यास पुन्हा झोप लागत नाही. बऱ्याच जणांना ही समस्या सतावते. तुम्हालाही हा त्रास होतो का? तर तुमच्यासाठी आहे एक उपाय
झोपमोड झाल्यास पुन्हा झोप येत नसेल तरी बेडवरुन उठू नये. तसेच झोप येत नसली तरी डोळे बंद करुन रहावे. गरज नसेल तर वॉशरुमलाही जाऊ नये.
जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्याचवेळेस तुम्ही जर झोपेत असाल तर हृदयाच्या ठोक्यांची गती कमी असतो. यामुळे जर हृद्याचे ठोके जलदगतीने होत असतील तर पुन्हा झोप येणे कठीण होते.