Ulcers in Mouth : साधारण शरीराची उष्णता वाढली की आपण म्हणतो तोंड आलं म्हणजेच तोंडाला पांढरे फोड...अल्सर झाला आहे. गालाच्या आतल्या बाजूला, जिभेवर, ओठांवर अगदी घशाला पांढरे फोड येतात. त्यामुळे रुग्णाला तोंडाला चव नसते, तो अगदी काही खाऊ पिऊ शकत नाही. जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण अल्सर होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण अल्सरवर वेळीच उपचार न घेतल्यास हे कर्करोगाचे कारण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला येणारे अल्सर कशामुळे आहेत आणि त्यावर घरगुती उपाय जाणून घ्या. 


'ही' आहेत तोंड येण्याची कारणं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलेल्या जीवनशैली हे अल्सरचे मुख्य कारण आहे. त्याशिवाय पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता, पित्त यामुळे तोंडात व्रण होतात. 


कडक ब्रशने दात घासणे 


चघळताना चुकून गाल चावणे


हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या जीवाणूंच्या उपस्थितीमुळे


शरीरात व्हिटॅमिन बी-12, झिंक, फॉलिक अॅसिड आणि लोहाची कमतरता


जास्त तळलेले आणि तिखट-मसालेदार अन्न खाणे


स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्समधील बदल


सोडियम लॉरील सल्फेट असलेले टूथपेस्ट किंवा माऊथवॉशमुळे


तणावामुळे तुम्हाला अल्सर होऊ शकतात. जास्त तणावामुळे शरीरात अल्कधर्मी आणि उष्णता वाढते. याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवरही होतो. त्यामुळे आपल्याला अल्सर होतात. 


जास्त प्रमाणात आम्लयुक्त पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे. शिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे. कोल्ड्रिंक्स पिणे, फास्ट फूडचे सेवन, जास्त मिरच्या आणि गरम मसाल्यांचे सेवन केल्यामुळे आम्लयुक्त प्रमाण वाढतं आणि अल्सर होतात. 


अति प्रमाणात चहा, कॉफी, तंबाखूचे सेवन, धुम्रपान करणे.


दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, दात स्वच्छ न ठेवणे.


दीर्घकाळ एखादे औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्‍ट होऊनही तोंड येतं.


काय आहेत घरगुती उपाय ? (Mouth Ulcer Remedy)


तुळशीचे दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्यावा.


ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्याने गुळण्या करा.


जेवणाच्या वेळा पाळाव्यात.


रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी.


लिंबाच्या रसात मध घाला आणि त्याने गुळण्या करा.


तोंड आल्यावर जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो.


तोंड आल्यास वाळलेले खोबऱ्याचे तुकडे चावून खा.


घरगुती देशी तूप लावणे. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)