Urine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, `या` उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Urine Problem In Winter: हिवाळ्यात (Cold) सारखे लघवीला पळावे लागते. तसेच अनेक लोक ऑफिसमध्ये AC मध्ये काम करत असतात. (Health Infromation News) अशावेळी लघवीला वारंवार जावे लागते. थंडीत वारंवार लघवीचा त्रास होतो. जाणून घ्या तुमच्यासोबत असे का होते. थंडीत वारंवार लघवी का येते. (Health News in Marathi) तसेच यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत, ते जाणून घ्या. ( Urine Problem News in Marathi)
हिवाळ्यात अनेक लोकांची वारंवार लघवीची तक्रार असते. थंडीत पाणी कमी प्यायले जाते. थंडीच्या मोसमात लघवीमुळे दिवसभर बाथरुममध्ये अनेक फेऱ्या मारणे त्रासदायक ठरते. लघवीशी संबंधित ही समस्या रक्तदाब वाढल्यामुळे होते. एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली असेल तर त्याला लघवीचा त्रास होतो. दरम्यान, थंडीमुळे की बीपी वाढल्याने सारखी लघवी होते का? याबाबत अधिक जाणून घेऊ या.
थंडीत सारखे बाथरुमला जावे का लागते?
आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असावे लागते. पण हिवाळ्यात जेव्हा थंडी खूप वाढते तेव्हा हे तापमान राखण्यासाठी शरीराला रक्ताभिसरण अधिक प्रमाणात आवश्यक असते. यासाठी हृदय खूप जलद आणि वारंवार पंप करते.
रक्तप्रवाह वाढल्यामुळे शरीरात निर्माण होणारी ऊर्जा शरीरातून पूर्णपणे बाहेर पडत नाही. शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह जलद होतो. अधिक गतीने शरीरात रक्ताभिसरण होते, तेव्हा शरीराचे अवयव देखील जलद कार्य करतात. त्याप्रमाणेच किडनीचे असते.
शरीरातील पचलेले अन्न आणि टाकाऊ द्रव गाळून मूत्रपिंड मूत्राशयात साठवून ठेवते आणि मूत्राशय भरल्यावर लघवीचा दाब निर्माण होतो. रक्तदाब वाढल्यामुळे, किडनी हा कचरा लवकर फिल्टर करते. अशावेळी लघवीला जावे लागते.
लघवीची समस्या का निर्माण होते?
थंड वातावरणात जास्त लघवी जावे लागते. थंडीत दर अर्ध्या तासाने किंवा एक तासाने लघवीला जावे लागते. त्यापेक्षा अडीच ते चार तासांच्या दरम्यान बाथरुममध्ये जावे लागते, ही सामान्य बाब आहे. पण जेव्हा थंडीमुळे लघवी येते, तेव्हा तुम्हाला दर तासाला लघवी करण्याची गरज भासते. जेव्हा तुम्ही बाथरुममध्ये जाता तेव्हा तुम्हाला खूप कमी लघवी जाते किंवा फक्त काही थेंब होतात, त्यावेळी काही तरी समस्या आहे, हे जाणून घ्या.
वारंवार लघवीला जाणे, यावर उपाय काय?
वारंवार लघवीला जाण्याचे टाळण्यासाठी तुम्ही सामान्य तापमानाचे जास्त पाणी प्यावे आणि थंड पाणी पिणे पूर्णपणे टाळावे. यासाठी पाण्याचा थंडावा निघेपर्यंत थोडे गरम करा.
चहा-कॉफी जास्त प्यायल्याने शरीरात पाणी कमी होते, त्यामुळे लघवी वारंवार पण कमी प्रमाणात येते. म्हणून, त्यांचे सेवन मर्यादित करा आणि हळदीचे दूध, केशर किंवा अंजीरचे दूध, गरम सूप इत्यादींचे सेवन वाढवा.
थंड हवेत बाहेर जाणे टाळा, जिथे बसाल तिथे दरवाजा बंद ठेवा, यामुळे खोलीचे तापमान सामान्य टिकून राहते आणि थंडी कमी होते.
सूर्यप्रकाशात घ्या. यामुळे शरीर उबदार होते आणि रक्तवाहिन्या देखील उघडतात. या पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)