मुंबई : भारतात स्थूलतेमुळे अनेक लोकं चिंतेत आहे. शिवाय लठ्ठपणा म्हणजे इतर अनेक आजारांचं निमंत्रण. सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा व्यक्तींमध्ये वाढताना दिसतोय. तसंच कोरोना काळात वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे या समस्येत अधिक वाढ झाली आहे. याचं एक कारण म्हणजे शरीरात फॅट वाढणं. पण अशा 3 गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे ही समस्या कमी होण्यास मदत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेली फॅट कमी करण्याच्या सोप्या टीप्स


ओव्याचं पाणी प्या


बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. हे वजन कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे पचन देखील सुधारतं. एक चमचा ओवा पाण्यात भिजवून रात्रभर भांड्यात ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात थोडं मध टाकून हे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.


ओवरइटींग करू नका


काही लोकं त्यांच्या भूकेपेक्षा अधिक खातात. अशा खाण्याची सवय फार वाईट असते. एकावेळी जास्त आहार घेतल्याने पोटाची चरबी वाढू लागते. 2 ते 3 तासांच्या अंतराने खाल्ले तर पचनक्रियाही सुरळीत होते. यासोबतच पाणी नियमित पिणं गरजेचं आहे.


गोड पदार्थांचं कमी सेवन 


जर तुम्हाला गोड पदार्थ जास्त आवडत असतील तर ते केवळ लठ्ठपणाच नाही तर मधुमेह आणि हृदयाचे आजारयांसारख्या गंभीर आजारांचं कारण बनू शकतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारातून गोड पदार्थाचं प्रमाण कमी केलं तर हळूहळू पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.