प्रेग्नेंसी कीट वापरताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
प्रेग्नेंसी किटचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.
मुंबई : प्रेग्नेंसीबाबत खात्री करून घेण्यासाठी आता प्रेग्नेंसी किटचा वापर केला जातो. परंतु या किटसह गर्भधारणा चाचणी करण्यापूर्वी आपल्यास काही गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. प्रेग्नेंसी किट टेस्टद्वारे महिलांच्या युरीनमधून एचसीजी हॉर्मोनजी मोजली जाते. एखाद्या महिलेच्या युरिनमध्ये एचसीजी हार्मोन्स आढळल्यास ती गर्भवती असल्याती शक्यता असते. मात्र या किटचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.
प्रेग्नेंसी टेस्ट करण्यापूर्वी त्याचा योग्य पद्धतीने वापर माहिती असला पाहिजे. नाहीतर अचूक रिझल्ट मिळू शकणार नाही. जाणून घेऊया या गोष्टींना
घड्याळाचा वापर करा
प्रेग्नेंसी टेस्टचा रिझल्ट समोर येण्यासाठी थोडा वेळ लागू शकेल. त्यामुळे वेळ पाहण्यासाठी घड्याळ वापरा. कारण रिझल्ट मिळवण्यासाठी तुमचा अंदाज किंवा अनुमान चुकीचा असू शकतात. ज्यामुळे तुम्हाला चुकीचा परिणाम मिळू शकेल.
मॉर्निंग युरिन तपासा
प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी महिलांनी सकाळची फर्स्ट युरिन तपासली पाहिजे. कारण यावेळी युरिनमध्ये एचसीजी होर्मोनची पातळी अधिक असते. ज्यामुळे प्रेग्नेंसी टेस्टचा परिणाम अचूक येण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला सकाळी चाचणी करणे शक्य नसेल तर काळजी करू नका. चार तास थांबून त्यानंतर युरिनची तपासणी करावी
कीटमध्ये असलेल्या ड्रॉपरचा वापर करा
बर्याच स्त्रिया किटमध्ये उपस्थित ड्रॉपर वापरण्यास संकोच वाटतात. परंतु असं करणं चुकीचा परिणाम देऊ शकतं. महिलांनी युरिनला ड्रॉपरमध्ये स्टोअर करून त्याची टेस्ट करावी.
टोल नंबरवर कॉल करू शकता
जर एखाद्या महिलेला किट वापरण्यासाठी सक्षम नसेल तर किटवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवा. यावर कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका.