ऑफिसमध्ये रहायचे असेल आनंदी तर, वापरा या हटके ट्रिक्स
कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात
मुंबई : कोणत्याही संस्थेची प्रगती व्हायची असेल तर, त्या संस्थेतील कर्मचारी आनंदी असणे महत्त्वाचे आहे. संस्थेतील कर्मचारी जर खांद्याला खांदा लाऊन काम करत असतील तर, संस्था यशोशिखरावर पोहोचते. मात्र, हे तेव्हाच घडू शकते जेव्हा संस्थेच्या कार्यालयातील वातावरण हलकेफुलके आणि आनंदी असते. कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात
कार्यालयात उत्साह वाढवण्यासाठी दररोज काही मिनिटांसाठी एखादा छोटासा उपक्रम राबवा.
कर्मचाऱ्यांचा दृष्टीकोण सकारात्मक कसा राहिल यावर विशेष भर द्या. तो त्याचे काम आनंदाने करतो आहे किंवा नाही याकडेही लक्ष द्या.
कर्मचाऱ्यांच्या सुखदुख:त सहभागी व्हा.
कर्मचाऱ्यांशी नेहमी नवनव्या गोष्टींवर चर्चा करा.
कर्मचाऱ्याने केलेल्या चांगल्या कामाचे त्याला श्रेय द्या. त्याच्या चुकीवर नको त्या आवाजात त्याच्यावर ओरडू नका. चुका खाजगीत सांगता येतील का ते पाहा.
अधून मधून एखाद्या कामासाठी कर्मचाऱ्यांचा सल्लाही घ्या. प्रत्यक्ष काम कर्मचारीच करत असतात. त्यामुळे त्या कामाबाबत ताजा अनुभव त्यांच्याकडे असतो.
कर्मचाऱ्यांना संस्थात्मक कार्यक्रम, प्रशिक्षण आदी गोष्टींमध्ये सहभागी करून घ्या.