Periodsमध्ये एकाच वेळी 2 पॅड्स वापरणं ठरेल हानिकारक
मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वच्छतेच्या बाबतीत फार काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं.
मुंबई : मासिक पाळी म्हटलं की होणाऱ्या वेदनांमुळे अगदी महिलांना अगदी नकोसं होतं. मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वच्छतेच्या बाबतीत फार काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. अनेकदा या दिवसांमध्ये ब्लड फ्लो जास्त असल्याने अनेक महिला एकाच वेळी दोन पॅड्सचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का असं करणं अयोग्य ठरू शकतं.
मासिक पाळीत जास्त रक्त प्रवाह म्हणजेच ब्लड फ्लो अनेक महिलांना जास्त जाणवतो. अशावेळी अनेक मुली किंवा स्त्रिया कपड्यांना डाग लागेल या भितीने भीतीमुळे 2 सॅनिटरी पॅड्स एकत्र वापरतात. मात्र असं अजिबात करू नये. यामुळे योनि आणि आसपासच्या भागाला संक्रमण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एकावेळी फक्त एक सॅनिटरी पॅड वापरावं. जर रक्ताचा प्रवाह जास्त असेल तर पॅड दर तासाला बदलत रहा.
तर काही महिला अधिक रक्तस्त्राव असल्यास सॅनिटरी पॅड्स किंवा टेम्पॉन्स, सॅनीटरी पॅड किंवा कापड अशा दोन गोष्टी एकत्र वापरतात. महिलांना त्यावेळी गरजेनुसार असं करणे योग्य वाटत असलं तरीही हे अजिबात योग्य नाही. असं केल्याने अधिक अस्वच्छतेमुळे तुम्हाला इनफेक्शन, रॅशेस येतात.
दरम्यान मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे योनिमार्गाच्या अनेक भागांमध्ये संक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी योनीच्या आसपासचा अवयव एकदम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. योनी स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. शिवाय धुतल्यानंतर ती जागा कोरडी करायला विसरू नका. शिवाय मासिक पाळीमध्ये कापड वापरणं टाळा. जाड व बराच काळ न बदललेल्या कापडामुळे योनीमार्गात संसर्ग होऊ शकतो.