केसगळती दूर करण्यासाठी आहारात या भाज्यांचा समावेश करा!
कोणत्याही मोसममध्ये केसगळती होत असते.
मुंबई : कोणत्याही मोसममध्ये केसगळती होत असते. आजकाल सामान्य झालेल्या या समस्येची कारणे अनेक आहेत. धावपळीचे जीवनमान, अयोग्य वेळी खाणे, जंक फूड, स्ट्रेस अशी विविध कारणे असू शकतात. मात्र आहारातील बदल या समस्येवर परिणामकारक ठरू शकतो. आहारात या भाज्यांचा समावेश केल्यास केसगळती कमी होऊन केस हेल्दी होण्यास मदत होईल. पाहुया कोणत्या भाज्या केसांना मजबूत बनवतील.
कांदा
केसगळीत थांबवून केस वाढीसाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय कांद्याचा रस केसांना लावल्याने केस मजबूत होतात.
गाजर
गाजरात अधिक प्रमाणात बायोटिन असते. त्यामुळे केसगळती होण्यास आळा बसतो. कच्चे गाजर खाल्याने केस चमकदार होतात.
कडीपत्ता
अनेक पदार्थांमध्ये फोडणीला आपण कडीपत्ता घालतो. कडीपत्त्यात अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॉमिन असतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने केस मजबूत होतात.
लसूण
लसूण अनेक प्रकारचे आजार दूर करतो. यात अॅँटी फंगल गुणधर्म असतात, त्यामुळे केसगळती कमी होते. त्याचबरोबर लसूण खाल्याने केसांना चमक येते.
काकडी
काकडीत भरपूर प्रमाणात विटॉमिन सी असल्याने केसांची वाढ मजबूत होते. त्याचबरोबर यात असलेल्या अॅंटीऑक्सीडेंटमुळे केसांना चमक येते.
कोथिंबीर
कोथिंबीरीत मुबलक प्रमाणात आयर्न आणि कॉपर असते. यामुळे केसगळती कमी होते. त्याचबरोबर केस लांब होण्यास मदत होते.
बटाटा
बटाट्यात स्टार्च असल्याने केस वाढीस आणि केसांना चमक येण्यास मदत होते. बटाट्याच्या सेवनाने केस कमी गळतात.
टॉमेटो
टॉमेटोत भरपूर प्रमाणात व्हिटॉमिन सी आणि अॅँटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे केसगळती खूप प्रमाणात कमी होते.
मेथी
मेथीत व्हिटॉमिन सी, प्रोटीन, पोटॅशियम आणि आयर्न असते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. केसगळतीची समस्या दूर करण्यास मेथी अत्यंत उपयुक्त ठरते.
बीट
बीट शारीरिक आरोग्याबरोबरच केसांच्या आरोग्यासाठीही लाभदायी ठरतो. हे खाल्याने केस मजबूत, दाट आणि काळेभोर होतात.