Viagra Benefits in Dementia Disease: लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेक पुरुष व्हायग्राचं सेवन करतात. इरेक्टाइल डिसफंक्शनने ग्रस्त रुग्णांनाही व्हायग्राची गोळी डॉक्टर देतात. तज्ज्ञांनुसार व्हायग्राच्या सेवनामुळे पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टला रक्तपुरवठा वाढविण्यासाठी आणि जननेंद्रियातील ताण वाढवतं. याशिवाय आता एका नव्या संशोधनातून व्हायग्राबाबत महत्त्वाचा दावा संशोधकाने केलाय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा दावा आहे की, व्हायग्रा गोळीच्या सेवनामुळे स्मृतिभ्रंश सारख्या धोकादायक आजारांवर मात करता येईल. एवढंच नाही तर स्मरणशक्ती कमी असल्यांना रुग्णांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. या संशोधनातून अनेक खुलासे समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या अहवालानुसार, व्हायग्रामध्ये आढळणारा सक्रिय घटक सिल्डेनाफिल पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या रक्तवाहिन्याच नव्हे तर मेंदूच्या सर्वात लहान रक्तवाहिन्या देखील उघडण्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहही सुधारतो आणि स्मरणशक्ती चांगली होण्याचा प्रमाणही सुधारण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर व्हायग्रामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास फायदेशीर आहे. संशोधकांना आशा आहे की व्हायग्रा स्मृतिभ्रंशावर बरा होऊ शकतो आणि या लोकांसाठी हा स्वस्त उपचार ठरु शकतो. पण संशोधकांनी असं म्हटलं आहे की, यावर अजून संशोधन आणि अभ्यास होण्याची गरज आहे. 


हेसुद्धा वाचा - Cholesterol Symptoms : हात आणि बोटांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय


ऑक्सफर्डमधील न्यूरोलॉजिस्ट आणि 'जर्नल ऑफ सर्क्युलेशन रिसर्च' मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे लेखक डॉ. ॲलिस्टर वेब सांगतात की, कोणत्याही संशोधनात असे परिणाम पहिल्यांदाच समोर आलेत. जेव्हा सिल्डेनाफिल स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचते तेव्हा ते रक्त प्रवाह सुधारण्यास मदत मिळते. रक्ताची कमतरता आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होतो, असं संशोधकांनी सांगितलंय. हा अभ्यास सिल्डेनाफिल हे स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी सहज उपलब्ध औषध असल्याचे म्हटलंय. मात्र या अभ्यासात अजून मोठ्या चाचण्या होणे बाकी आहे.


सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्लीचे वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता सांगतात की, हे संशोधन सिल्डेनाफिलला रक्तवहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंश सुधारण्याशी जोडणारे अनोखे संशोधन म्हणून समोर आलंय. यामुळे भविष्यात सिल्डेनाफिलचा उपयोग स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी करता येईल अशी आशा पल्लवीत झाली आहे.


हेसुद्धा वाचा - दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?


डॉक्टर सांगतात की, गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण, वारंवार विसरण्याची सवय, विचार आणि समजण्यात अडचण आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे ही डिमेंशियाची लक्षणे असतात. अल्झायमर हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार मानला गेला आहे.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)